मुंबईतील मुजोर रिक्क्षाचालक
आवरा या मुजोर
रिक्क्षावाल्यानां...
माज आणि मस्ती बघायची असेल तर ती पहावी
मुंबईच्या रस्तावर आपल्याच गुर्मीत धावणाऱ्या रिक्क्षाचालकांची. त्यानां ना
वृद्धमंडळी दिसत ना गरोदर स्त्रीयां, ना महिला, ना आजारी माणसे, ना लहान मुले थेट
झिडकारत निघुन जातात. यानां वठणीवर आणण्यासाठी कृपया प्रशासनाने लवकरात लवकर काही
तरी दखल घेतली पाहिजे. खरचं आज मुंबईकर मोठ्या त्रासातुन जात आहेत यानां वेळीच आवर
घालणे फार गरजेचे आहे या व्यवसायात आज मोठ्या प्रमाणात परप्रांतिय घुसले
परवाण्यासाठी आठ – आठ हजार मोजुन त्यांनी मुंबईच्या रिक्क्षांचा ताबा
मिळवला आणि यानां भाड्याने रिक्क्षा उपलब्ध करुन देणारे रिक्क्षाचे खरे मालक
मोठ्या प्रमाणात मराठीच आहेत घरी बसुन ८ तासावर रिक्क्षा या भैय्यानां भाड्याने
उपल्बध करुन देणारे हे महाशय घरी बसुन दिवसाला रिक्क्षाच्या भाड्याचे ६०० रुपये
एका दिवसाला कमावतात.. आज प्रत्येक व्यवसायात सगळेच वाईट आहेत आहे असे नाही पण या
रिक्क्षाचालकांमध्ये सज्जन रिक्क्षांचालकांची संख्य़ा हातावरच्या बोटावर
मोजण्याइतकीच राहिली आहे.
आणि एखाद्या नैसर्गिक किंवा
अनैसर्गिक आपत्तीच्या वेळीस जादा भाडे आकारणे,
हे आता नित्यनियमांचे झाले आहे. आज
मुंबईत असा एक ही मुंबईकर नाही की ज्याला हे सगळे सहन करावे लागले नाही. कायद्यात
रिक्क्षाचालकांनी भाडे नाकारु नये असा नियम आहे पण आज असे होते का? नियम
फक्त आपल्यालच ? वृद्ध,गरोदर महिला, आजारी माणसे
कोणाच्याच बद्दल यांना ना काहिच वाटत नाही. लोक रिक्क्षाच्या मागे अगदी पळत असतात
आणि हे महाराजाप्रमाणे सरळ निघुन जातात किंवा थेट नाही जा काय करायचे ते करा असेच
दरडावतात. काहीच्यां तर तोडांतुन शब्दसुद्धा निघत नाही. मुक्क्याप्राण्यासारखी
नकारार्थी मान हालवतात.
आज
मुंबईच्या अनेक रस्त्यावर रिक्क्षाचालकांची मुजोरी चालते भाडे नाकारणाऱ्या
रिक्क्षा कुर्ला,विद्याविहार,शीव,घाटकोपर,कांजुरमार्ग अशा अनेक रेल्वे
स्थानकांच्या बाहेर दिसुन येतात. विक्रोळीला तर या रिक्क्षाचालकांचा हैदोस असतो
आपल्या मर्जीने भाडे स्विकारणे आणि आकारणे येथे सर्रास चालते. त्याबरोबरच
वांद्रे,खार,सांताक्रुज, विद्यापीठ परीसरात सुद्धा या रिक्क्षाचालकांची मनमानी
चालते.
या रिक्क्षावाल्यांनी मुंबई आणि उपनगरात
नुसता उच्छाद मांडला आहे. का प्रशासन अशा रिक्क्षाचालकांवर कार्यवाही नाही करत? आणि
काही झाले तरी यांचे रिक्क्षा युनियन म्हणते बंद आणि बंद..!!
मुंबईकरानां वेठीस धरुन काय मिळते यांना.? आता तर म्हणे
त्या शरद रावांनी सांगितले की, भाडेवाढ करा नाही तर रिक्क्षा बंद आंदोलन करु अशा
आंदोलनांनी सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि सरकारला धमकी देणाऱ्या युनियनला
सरकारने चांगले सरळ केलेच पाहिजे. मुख्यमंत्र्यानी यांचे आव्हाहन स्विकारुन यांना
आता बंद करुनच दाखवा असे खडे बोल सुनावले पाहिजे आणि जर यांची हिम्मत झालीच तर
लगेच खाजगी वाहतुकीला परवानगी द्यावी काही दिवसांसाठी. आणि अशा प्रकारे याचां संप
चिरडुन टाकावा. जसे गिरणीकामगारांचे आंदोलन चिरडले गेले तसे या युनियनवाल्यानां
आणि त्याच्या स्वयभूः स्वार्थी नेत्यानां चिरडले पाहिजे आज असे अनेक रिकक्षाचालक
या बंदच्या विरोधात असतात पण होते काय यांनी बंदला विरोध करत रिक्क्षाचालवल्या तर
यांचे तारणहार म्हणुन मिरवणारेयुनियनवालेच यांच्या रिक्क्षा फोडतात. मग त्यानां
नाईलाजास्तव बंद मध्ये सहभागी व्हावेच लागते. आज यामुळे अनेक रिक्क्षाचालक दबावाखाली
रिक्क्षा चालवतात हेही एक सत्यच आहे. आज यासर्व प्रकारांमुळे सामान्य व माझ्या
सारखा मुंबईकर यामुळे खरंच खुप खुप त्रासला गेला आहे. शासनाने यासाठी लवकरातलवकर
काहि तरी पावले उचलावीत. व यामध्ये स्वताः राज्याच्या प्रमुखांनी लक्ष घालावे अशी
नम्र व तीव्र प्रमाणिक इच्छा..!!!!



Comments
Post a Comment