“आम”च भुत…!!!
“ आम ” च भुत… !!! राजकारणाला अरविंद केजरीवाल नावाच्या भुताने झपाटले. दिल्लीच्या तख्तावर असणारी कॉग्रेसची सत्ता या भुताने गिळुन टाकली असे ऐकिवात आहे. ऐकीवातच नाही हो खरंच आहे. बसायला व्हॉल्वोची बस कमी पडणाऱ्या दिल्लीतील कॉग्रेस आमदारांची संख्या आज एक इनोव्हात पुरुन उरेल इतकीच ठेवली या “ आम ” च्या भुताने. हे भुत म्हणतयं मी “ आम आदमी ” आहे. पण कालच आलेल्या बातमीत असं कळतयं की या भुताला रहायला ९ खोल्यांचा फ्लॅट लागतोय.. अबब खरंच आहे की नाही भुत... असो सध्या आपण वाचत आहात ते आम आदमीच्या भुताची कहाणी या भुताची भिती इतकी झाली की, दिल्ली सकट संपुर्ण भारताच्या राजकारणात ‘ आम आदमी ’ च्या भुताची हवा आली. अगदी महाराष्ट्रात सुद्धा या भुताची भिती वाऱ्यासारखी पसरली. ‘ रामन राघव ’ पुन्हा आला हो. पुर्वी ‘ रामन राघव ’ हा फुलपाखरांच्या रुपात येऊन मारुन जायचा. पण अरविंद केजरीवाल हा साध्या वेषात येऊन मारत नसुन संपवुन जातोय. श्रद्ध...