नितीमुल्यांवर नाचणारी पत्रकारीता...
नितीमुल्यांवर नाचणारी पत्रकारीता... बाळासाहेबानां जाऊन फक्त काही तासांचा अवधी लोटला असतानां इलेक्ट्रोनिक माध्यमांनी चर्चेला व बातमीला बनवलेला हा स्मारकाचा विषय हा टीआरपीसाठी केला जाणारा धंदाच आहे. नुकत्याच काही दिवसांपुर्वी बाळासाहेबांचे दिर्घ आजाराने निधन झाले. बाळासाहेब महापुरुष होते यात वाद नाही परंतु त्यांच्या स्मारकाची घाई लक्षात घेता आज नाही तर कधीच नाही अशी जणु भितीच या माध्यमांना वाटत असल्याचे जाणवते. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्क वर व्हावे ही इच्छा मनोहर जोशीनीं बाळासाहेबांच्या अस्थी गोळा करायला गेल्यावर माध्यमांसमोर बोलावुन दाखवली. आता जोशीचे आणि बाळासाहेबांचे संबंध कसे होते हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे या संबंधातुन अशीच मागणी जोशी करतील हे सुद्धा अपेक्षितच होते. पण त्यांनी ही मागणी इतक्या लवकर करायला नको होती कारण बाळासाहेबांच्या चित्तेचा अग्नी विझतो न विझतोच महाराष्ट्रातील माध्यमांमध्ये जोशीच्या या मागणी ...