माध्यमांची घसरलेली नितीमुल्य.



माध्यमांची घसरलेली नितीमुल्य.
               
                    पुर्वी दर्पन, केसरी सारख्या वर्तमानपत्रांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य करत भारतीय स्वातत्र्यांच्या लढ्यात आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग नोदंवला. मराठा,तरुण भारत सारख्या वर्तमानपत्रानी संयुक्त महारष्ट्राचा लढा लढवला या सारख्या वर्तमानपत्रानीं व माध्यमांने समाजाला आणि समुहाला दिशा देण्याचे पवित्र कार्य केले. पण आजचे वृत्तपत्रांनी व माध्यमांनी समाजाला दिशा देण्याऐवजी समाजाची दशा करुन ठेवली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज माध्यमांचे स्वरुप बदलले आहे. माध्यमांची कार्यालये कॉर्पोरेट झाली असुन व्यवस्थापनाचा अभ्यास केलेल्या तरुणांच्या हाती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कॉलर आवळल्या गेली आहे. बातमी ही आता टीआरपीसाठी चालवली जाते. प्रत्येक वृत्तपत्र त्या वृत्तपत्राने ठरवलेल्या अजेड्यांनुसार काम करत आहे. आपला अंजेडा लोकांवर लादण्यासाठी इतिहासातील यांचे जिवंत उदाहरण म्हणजे आणीबाणीच्या काळात त्यांना समर्थन करणारे मुख्य माध्यम म्हणजे दुरदर्शन. आणीबाणी देशाच्या हितासाठी आहे हे पटवुन देण्याचा केविलवाणा प्रयत्न या माध्यमांकरवी केला गेला. त्यानुसारच आजची माध्यमं सुद्धा आपला अंजेडा लोकांवर आणि समुहावर रुजवण्यासाठी विशेष मेहनत करतानां दिसुन येत आहेत. सबसे तेजच्या या माध्यमांमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात विषमता व एकमत तयार होतानां दिसुन येत नाही. एका विशिष्ट ध्येयासाठी झपाटलेली पुर्वीची माध्यमं आणि हल्लीची माध्यमं यात बराच फरक दिसुन येतो आहे. अनेक मोठे पक्ष राज्यातील मोठी माध्यमसंस्था चालवत आहेत. यामध्ये कॉग्रेसचे मंत्री असलेले दर्डा हे लोकमत समुहाचे मालक आहेत तर प्रहार हा कॉग्रेसचे जेष्ठ मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा आहे. सकाळ सारखा पेपर हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंधुच्या मालकीचा आहे तर सामना हा ठाकरे कुटुंबाच्या मालकीचा आहे अशा प्रकारे प्रत्येक पक्षाने राज्यातील मोठ्या माध्यमंसमुहात आपले पाय रोवले. माध्यमंही मतनायकाची भुमिका बजावत असतात असा सिद्धांत लाजरफेल्ड यांनी यापुर्वी मांडला त्यानुसार आज माध्यमेच आपल्या सोयीनुसार बातम्या प्रसारीत करतानां दिसुन येतात. पण माध्यमांनी नेहमी तटस्थ असावे एका बाजुने पत्रकारीता करु नये असे नितीमुल्य असतानांही आपण माध्यमांर विश्वास नाही ठेवु शकत. खाण घोटाळाप्रकरणी दर्डावर आरोप झाल्यानंतर कितीवेळा आयबीएन लोकमतने दर्डाच्या घोटाळ्यावर आजचा सवाल हा कार्यक्रम चालवला असा प्रश्न येथे थेट उभा राहु शकतो. माध्यमांनी स्पर्धेच्या या युगात आपल्या सिद्धांताना व मुल्यानां यामुळे दगा दिला हेच एकमेव काय ते सत्य. यासाठीचे जिवंत उदाहरण म्हणजे नुकतेच बंद पडलेले न्युज ऑफ दि वर्ल्ड तर जिदांल समुहाने झीसमुहाच्या मालकांवर टाकलेल्या १०० कोटीच्या खंडणीचा चौकशीने हल्लीची माध्यमं जगाला किंवा समाजाला काय संदेश देतील व कोणते प्रबोधन करतील हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.

Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क