Posts

Showing posts from October, 2012

शब्दांवर कोणाचा हुकुम...???

शब्दांवर कोणाचा हुकुम... ??? भा षा प्रत्येकाची वेगळी असते तर शब्दही वेगळे असतात. शब्द हे त्या त्या भाषेवर अंवलबुन असतात. पण एक भाषा बोलणाऱ्या समुहाची जशी भाषा एकच असते तसेच त्यांचे शब्दसुद्धा सारखेच असतात. आणि त्यांची वाक्य सुद्धा काही प्रमाणात मिळतीजुळती असतात. परंतु योग्य शब्दांचा वापर करुन वाक्य तयार केली जातात. आणि प्रत्येक वाक्यांचा निर्माता हा ते वाक्य तयार करणारा व्यक्तीच असतो. आज आपल्याला शब्द तयार करता येत नाही परंतु शब्दांचा आधार घेऊन आपण वाक्य मात्र तयार करु शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती आपआपल्या शैलीनुसार त्या वाक्यांना व त्या वाक्यांतील शब्दांवर कमी जास्त जोर देऊन सादर करत असतो. अशीच वाक्य कायम अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. प्रत्येक वाक्य एखादी व्यक्ती आपल्या कल्पनेतुन सादर करत असते. “ आई मला जेवण दे ” हे वाक्य मी तयार केले आहे. या वाक्यातील शब्दांचा निर्माता जरी मी नसलो तरी त्या वाक्याचा निर्माता मी आहे असे मी येथे म्हणु शकतो परंतु आता याच वाक्याचा यापुर्वीही कोणीतरी निर्माता असु शकतो कारण प्रत्येकांच्या कल्पना जरी वेगळ्या असल्यातरी अनेकवेळा वाक...

संवाद माध्यमांची संस्कृती...

संवाद माध्यमांची संस्कृती.... सं स्कृतीत संवाद आणि संवादात संस्कृती आहे आणि रेडीओ, इंटरनेट, दुरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रे ही संवादमाध्यमेच आहेत. त्यामुळे रेडीओ, इंटरनेट, दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रे यांमध्ये संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात वापर होत जातो. भारतीय संस्कृतीतील संवादमाध्यमे सुद्धा आज आपल्याला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. संस्कृतीत संवाद होतो आणि संवादातुन संस्कृतीचे दर्शन घडते. संवाद माध्यमांमध्ये म्हणजेच रेडीओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे आणि इंटरनेट यातुन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडत असते. वर्तमानपत्रात गुरुपोर्णिमेचे महत्त्व दर्शवणारे लेख किंवा दसऱ्याच्या मुहुर्तावर आपट्याच्या पानांचे महत्त्व वर्तमानपत्रातील लेखातुन प्रसिद्ध केले जाते. तर मालिकामध्ये सुद्धा पात्रांची केशभुषा, वेशभुषा आणि त्यातील दुश्य यातुन वारंवार आपल्याला आपल्या संस्कृतीचे महत्त्व कळत असते त्याच बरोबर रेडीओतील दिवाळीचा कार्यक्रम किंवा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या संकल्पना यातुन आपल्याला आपली संस्कृती बाबत चर्चासत्र आयोजित करणारे कार्यक्रम आखले जातात. त्यानुसार आपण आपल्या संस्क...

भंगारातले स्कायवॉक...

Image
भंगारातले स्कायवॉक... मुं बईत एमएमआरडीएने मोठा गाजावाजा करत मुंबई आणि उपनगरात स्काय वॉक बांधण्याची घोषणा केली होती पण या स्कायवॉक मुळे प्रशासनाचे पैसे पाण्यातच गेल्याचे चित्र आज आपण पाहत आहोत. २००७साली मुंबईत ५० स्कायवॉक बांधण्याचा संकल्प एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यानीं केला होता.पुर्व अभ्यास व योग्य नियोजन न पाहता या प्रकल्पाला हात घातला पण अनेक स्कयवॉक तयार झाले. ते म्हणतात ना !! “ जेवण वाढले   पंचपक्वान … पण जेवायला नाही कुणी !” अशी अवस्था या स्कायवॉकची होऊन बसली.               लोकांची गरज नसतानांही असे स्कायवॉक बांधुन ठेवले. दिवसा कुत्रंही न फिरकणाऱ्या स्कायवॉक मुळे स्थानिक लोक तर प्रचंड भडकलेच. आणि लोकांचा विरोध पाहता व कंत्राटदारांनी चांगलेच कमाविल्यावर मग एमएमआरडीए ला साक्षात्कार झाला . स्कायवॉक असावे की नसावे व त्याचा उपयोग होतो की, नाही हे पडताळण्यासाठी सर्वेक्षण झाले. हे सर्वेक्षण करेपर्यंत ५०च्या ऐवजी ३६ स्कायवॉक बांधुन पुर्ण झाले. आता काय कपाळ.. !! आता पुढे त्याच्याच सर्वक्षणातुन ...

पुरस्कारांची घराणेशाही...

Image
पुरस्कारांची घराणेशाही..         नुकतेच कळाले की, पं.हदयनाथ मंगेशकर पुरस्कार हा जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना घोषित झाला आहे. लहान भावाच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मोठ्या बहिणीला दिला जाणार आहे. आपलेच लोक आणि आपलाच पुरस्कार हे कसं समीकरणं जुळते. आशा भोसले या एक कलावंत आहेत त्यात वादच नाही. पण पं.हदयनाथ पुरस्कार हा पंडीत हदयनाथ भोसलेयांच्या हद्येश आर्टस तर्फे देण्यात येतो. घरातलीच संस्था आणि घरातल्याच व्यक्तीच्या नावे दिला जाणारा पुरस्कार आणि तोही घरातल्याच व्यक्तीला आणि तोही घरातल्याच व्यक्तीच्या हस्ते हे किती गौरवास्पद आहे. हे काय कळलं नाही बुवा... ! आता आशा भोसलेनां कुणी ओळखत नाही असे पण काही नाही.जगभरात त्यांचे चाहते आहे. त्या एक जेष्ठ लोकप्रिय गायिका आहेत तसेच जगभरात त्यांची खंमग पदार्थांची सेवा देणारे त्याचे अनेक रेस्टॉरेन्टस् आहेत अशा नेहमी चर्चेत राहणाऱ्या आशा भोसले या जेष्ट गीतकार आर.डी.बर्मन यांच्या पत्नी आहेत. अशा सुप्रसिद्ध आशा भोसले यानां घरातील पुरस्कार देण्यात काय अर्थ ? कलावंताला त्याची कला जोपासण्यासाठी त्या कलेला...

पिस्तुल रक्तरंजितच....

Image
पिस्तुल रक्तरंजितच.... पिस्तुल   हे परवानाधारक असो की, नसो त्यातुन नुकसानच होते. सध्या गाजत असलेल्या वर्षा भोसले आत्महत्या प्रकरणांने चांगलाच जोर धरला आहे. दस्तुरखुद्द जेष्ठपार्श्वगायिका आशा भोसले यांनी वर्षा भोसलेनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे एक दोन नव्हे तर चक्क तीस वर्षापुर्वी हरवलेले आहे असे सांगितले मग इतक्यावर्षापुर्वी हरवलेले पिस्तुल चांगल्या स्थितीत कसे बरे होते की, चक्क त्यातुन २ गोळ्या निघाल्या. ३० वर्षापुर्वीपासुन हे घातक शस्त्र आशा भोसलेच्या घरांवर डोळा ठेऊन होते हेच काय ते सत्य. आज स्वंरक्षणासाठी घेतलेल्या पिस्तुलातुन स्वंरक्षण करण्यापेक्षा घातच जास्त झाले. काही दिवसापुर्वी वर्षा भोसलेनीं आत्महत्या केली म्हणुन आता या पिस्तुलाचा विषय निघाला पण आजवर यामधुन मोठया प्रमाणात घातच झाले आहेत.                  पिस्तुल खरेदी करणे म्हणजे कुण्या सोम्यागोम्याचा खेळ नाही. परवानाधारक पिस्तुलासाठी आयुक्तांपासुन थेट मंत्र्यापर्यत जाण्याची वेळ येते. सहजच परवाना मि...

बांग्लादेशी घुसखोरांचा नंगानाच

Image
बांग्लादेशी घुसखोरांचा नंगानाच भा रताच्या एका राष्ट्रात म्हणजेच आसाम मधील बोडो जिल्हात मोठ्या प्रमाणात दंगल उसळली. हि दंगल नेहमी प्रमाणे हिंदु मुसलमानांचीच होती पण यात असलेले मुस्लिम हे भारतीय नसुन बांग्लादेशी होते. बांग्लादेशातुन मोठ्या प्रमाणात घुसखोर आसाम तसेच भारताच्या विविध राज्यात   दाखल झाले आहेत. हे एक विदारक सत्यच आहे. बांग्लादेशातून सातत्याने मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरु आहे. २०१० च्या जनगणनेनुसार १५ टक्के असलेल्या घुसखोरांची संख्या ३१ टक्क्यावर गेली आहे. त्यावरुन बांग्लादेशातून सध्या किती घुसघोरी सुरु आहे याची कल्पना येऊ शकते. कोक्राझार , चिरांग , धुबरी जिल्ह्यातील हिंसाचाराने पुन्हा एकदा स्थानिक आणि बांग्लादेशी घुसखोर यांच्यातला जुना वाद उङ्गाळून आला आहे. आसामच्या सीमारेषा धुमसण्याचे खरं कारण ’ भाकरी ’ हेच आहे. बांग्लादेशची अवस्था पाहता मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या आणि बेकारी यामुळेच मोठ्या प्रमाणात बांग्लादेशीयानां भारतात घुसखोरी करावी लागते. कुठल्याही देशाचे नागरीक स्वइच्छेने आपला प्रांत सोडत नाही तर परिस्थितीने त्यानां तसे करावे ...