Posts

Showing posts from June, 2020

सुशांत आणि आई

Image
सुशांत सिंगराजपूत गेला, स्वतःला संपवलं त्याने.. ज्या गळ्यात सेल्फी साठी सत्करासाठी हार फुल पडत होते त्याच गळ्यात आज सुशांतने फासाचा दोर टाकला, आणि एका क्षणात संपला. जे कारकिर्द उभं करण्यासाठी त्याने शेकडो किलोमीटर दूर येऊन खान-कपूरांच्या भाऊगर्दीत स्वतःची ओळख तयार केली. आज एका क्षणात ती सगळी ओळख संपली आता सुशांत फक्त आठवणीत राहील.. आणि पुढची पिढी कौन सुशांत? असा प्रश्न जरूर विचारेल.  सुशांतच्या मृत्यू नंतर तो मानसिक तणावाखाली होता असं सांगितलं जातंय. अगदी मी मुद्यावर येतो, म्हणजे त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या आई ला उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यामध्ये त्याने लिहिलं होतं जीवन क्षणभंगुर आहे. या मानसिक तणाव मध्ये त्याला त्याची आई आठवली. आज ती माऊली असती तर त्याने कदाचित असं केलं नसतं.  आई जवळ गेला असता तिच्या कुशीत शिरून काही बोलला असता.. मन मोकळे करून रडला असता.. हसला असता.. खेळला असता बागडला असता, हट्ट पुरवून घेतले असते, रुसला असता, रागावला असता, काही तरी केलं असतं पण स्वतःला संपवलं नसतं.  आज सुशांत कडे सगळं होतं पण आई नव्हती.. आणि त्याच नसलेल्या आईची त्याल...