Posts

Showing posts from 2019

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

Image
मी मोदी भक्त नाही. तरीही मोदींनी इस्रो प्रमुखांना जवळ घेऊन मारलेली मिठी अनेकांना खुपली त्यावर काहीनी जावईशोध लावले. वर इस्रोच्या प्रमुखांना हे शोभत नाही, पदाला साजेसं राहावं अशा शहाणपणाचे डोस अनेकांनी फेसबुकवरुन त्यांना पाजले.  त्याही उप्पर जाऊन अमेरीकेत मोहिमा अयशस्वी झाल्यावर नासा प्रमुख रडत नाही अशी थुकरट उदाहरण ही देऊन झाली  आणि अनेक अंधळ्या मोदी द्वेषींनी हेच सडके विचार सरसकट शेअर केले.     मोदींच्या धोरणांना, विचारधारेला विरोध करणं हे सशक्त लोकशाहीच्या जिवीताचं लक्षण आहे पण म्हणून सरसकट उचलली जीभ लावली टाळ्याला असं करुन स्वताचं हसं करुन घेण्यात कसली आली धन्यता?     मोदी इस्रोच्या कार्यालयात मोदी कुटुंबियांचे किंवा भाजपचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते. ते देशवासियांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोहिम अयशस्वी झाल्यानंतर आपण सगळे हिरमुसलो पण प्रत्येकाला त्या शास्त्रज्ञांबद्दल अभिमान वाटला, मला सांगा कोणाला अभिमान नाही वाटला?  मग जर मोदींनी तिथे जाऊन त्यांना मिठी मारली, त्यांचे अश्रु पुसले, त्यांना धीर दिला तर तर काय...

IPL सोबतच माझी ही मॅच..

Image
  मॅचची अशीही आठवण... (दोन्ही जर्सी सोबत एकाच स्टूडिओत) अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत   मुंबई इंडियन्सने   चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला , ही मॅच जशी तुमच्यासाठी उत्कंठावर्धक ठरली तशीच माझ्यासाठी देखिल एक अनोखा अनुभव देणारी ठरली, तसा लहानपणापासून माझा आणि क्रिकेटचा दूरदूरवर संबंध नाही, आणि भारत-पाक सोडून मी मॅच सहसा पाहत नाहीच. त्यामुळे मॅच मध्ये स्ट्रोक, खेळी, शॉट्स याबद्दल मला फारच किमान ज्ञान. आणि म्हणूनच आयपीएलच्या १२ व्या सिजनची फायनल मॅच माझ्यासाठी वेगळी ठरली, ऑफीसमध्ये पोहचेपर्यंत आज फायनल आहे याबाबत माहितच नव्हतं, ऑफीस डेस्कवर चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सची जर्सी पाहिल्यावर लक्षात आलं आज आपल्याला यावरच बातम्या द्यायच्या आहेत, बऱ्याचदा आम्ही विशेष विषयांच्या बातम्या देत असतांना तसाच गेटअप करत असतो. वेषभूषा ही संबंधित बातमीशी साधर्म्य असणारी असावी असा किमान प्रयत्न असतो, म्हणून  IPL  मॅचवर आधारीत पहिलं बुलेटीन सहकारी वैभव कुलकर्णीनीं घेतल...

पार्थ नावाचा नवा स्पार्क

Image
#स्नेहिल_बाण #स्नेहिल_म्हणे पार्थ पवार नावाच्या त्रिकोणाची तिसरी बाजू आज हा लेख वाचत असतांना पार्थ पवारवरच का लेख लिहावासा वाटला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याला उत्तर हे आहे की, पार्थ पवार हा राजकारणात आलेला खऱ्या अर्थाने युवा चेहरा. तसा पार्थ काही पहिला नाही यंदा सुजय विखे, रणजित सिंह आणि पार्थ यांच्या सक्रिय राजकारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली. सुजय विखे आणि रणजित सिंह हे याधीच राजकारणात सक्रीय होते म्हणून त्यांच्याबद्दल मला लिहावसं वाटलं नाही त्यातुलनेत पार्थची पाटी तशी कोरीच म्हणून हा लेख लिहीतोय, हा लेख लिहायला मला राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याने किंवा पक्षाने सांगितलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी पाहता पार्थ सारख्या तरुण उमेदवारासाठी लिहावं असं जरुर वाटलं. म्हणून लिहीतोय. एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा राजकारणात आला तर त्यात वेगळं ते काय? ते होणारच होतं.. कधी ना कधी तो राजकारणात येणारच होता.. किंवा कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असे अनेक प्रश्न आणि दावे उपस्थित झाले. खुद्द पार्थच्या आजोबांनी ...