IPL सोबतच माझी ही मॅच..
मॅचची अशीही आठवण... (दोन्ही जर्सी सोबत एकाच स्टूडिओत) अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला , ही मॅच जशी तुमच्यासाठी उत्कंठावर्धक ठरली तशीच माझ्यासाठी देखिल एक अनोखा अनुभव देणारी ठरली, तसा लहानपणापासून माझा आणि क्रिकेटचा दूरदूरवर संबंध नाही, आणि भारत-पाक सोडून मी मॅच सहसा पाहत नाहीच. त्यामुळे मॅच मध्ये स्ट्रोक, खेळी, शॉट्स याबद्दल मला फारच किमान ज्ञान. आणि म्हणूनच आयपीएलच्या १२ व्या सिजनची फायनल मॅच माझ्यासाठी वेगळी ठरली, ऑफीसमध्ये पोहचेपर्यंत आज फायनल आहे याबाबत माहितच नव्हतं, ऑफीस डेस्कवर चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सची जर्सी पाहिल्यावर लक्षात आलं आज आपल्याला यावरच बातम्या द्यायच्या आहेत, बऱ्याचदा आम्ही विशेष विषयांच्या बातम्या देत असतांना तसाच गेटअप करत असतो. वेषभूषा ही संबंधित बातमीशी साधर्म्य असणारी असावी असा किमान प्रयत्न असतो, म्हणून IPL मॅचवर आधारीत पहिलं बुलेटीन सहकारी वैभव कुलकर्णीनीं घेतल...