Posts

Showing posts from 2012

दुखाचा सुर्य मावळला...

Image
दुखाचा सुर्य मावळला... दुखाचा सुर्य मावळला...               आजचा सुर्य मावळला. मावळता सुर्य आपल्या सोबत अनेक दुख घेऊन गेला. २०१२ हे वर्षच तसं दुखात गेलं. महाराष्ट्रावर तर अनेक संकटाचे पहाड कोसळले. अनेक सुखद घटना कमी आणि दुखाचे सावट घेवुन आलेल्या या २०१२ ने आपल्याला फार काही दिले असे नाही. पण अनेक महाराष्ट्राचे रत्न आपल्यातुन या कुटील डावाने हिरावुन घेतले. सिनेसृष्टीतर दुखाचे सावटच होते. वर्षाच्या सुरवातीलाच कल्पना मोहन, रुबीना शेरगील, मोना कपुर, जॉय मुखर्जी, अचला सचदेव सारख्या जेष्ठ तारकांच्या निधनाने २०१२ सुरु झाले. दिग्दर्शक ओ.पी. दत्ता हे सुद्धा वृद्धापकाळाने गेले. मुंबईचे मा. पोलिस आयुक्त हसन गफुर यांचे हद्यविकाराने निधन झाले. हसन गफुरांच्या निधनांने मुंबई पोलिस हादरले शिस्तप्रिय आणि आपल्या पोलिसांवर प्रेम करणारा अधिकारी इतक्या लवकर जाईल असे कदापि कोणालाच वाटले नव्हते. त्यानंतर सगळे हळहळले ते रसना गर्ल तरुणी सचदेवच्या अपघाती निधनाने याच मे महिन्यात बॉलीवुडचा बॉडीबिल्डर ...

खरा न्याय द्या...!!!

Image
  खरा न्याय द्या... !!!   दुर्देवी भारतीय नारीचा सिंगापूरच्या अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त असणाऱ्या इस्पिताळात मूत्यु झाला. नियतीने १६ डिंसेबर रोजी मनाने मारलेल्या माझ्या भारतीय भगिनीला २९ डिसेंबर च्या मध्यरात्री शरीररुपाने आपल्यातुन नेले. भारतात मनाने मारुन शरीररुपी हाल सोसण्यासाठी तिला सिंगापुरच्या रुग्णालयात शरीराने जिंवत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु काळाने आपला डाव साधला आणि एका सुसंस्कृत घराण्यातील विद्यार्थींनींचा अतिशय वाईट आणि करुण अंत झाला. तिच्या निधनांची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग सुरु झाला प्रतिक्रियांचा पाऊस.. नेते, गणमान्य व्यक्ती, सेलिब्रेटी, विद्यार्थी अशा प्रत्येक स्थरांतील लोकानीं आपल्या भावना व्यक्त केल्या. “ देश की बेटी ” अशी त्या दुर्दैवी नारीला उपाधी मिळाली. ‘ देश की बेटी ’ जर ती खरचं असती तर आता तिच्यावर ही वेळ आली असती का ?   ज्या दिवशी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार झाला त्याच दिवशी ती गेली. नराधम राक्षसांनी एकापाठोपाठ एक असे जबरी बलात्कार करुन तिला हालाहाल केले. हेच कमी की काय म्हणुन नतद्रष्ट क्रूर लांडग्यांनी तिच्या शरीरा...

वाटेत तुझ्या काचाच गं…!

Image
वाटेत तुझ्या काचाच गं… !                                 आज दुपारी सुमारे दोनच्या दरम्यान माझ्या मोबाईल मध्ये मेसेजची ट्युन वाजली. पोपटाची शिटी मेसेजट्युन असल्यामुळे समोरच बाललीला करणारी एक दीड – दोन वर्षाची निष्षाप चिमुरडी माझ्या कडे पाहुन अलगद हसली. मी ही निंवात असल्यामुळे व तशी लोकलला गर्दी ही नसल्यामुळे तो मेसेज मला वाचता आला. मेसेज पाठवणारी तरुणी माझ्या चांगल्या ओळखीची. त्यामुळे इतका मोठा मेसेज पाहून थकल्यासारखे वाटले पण सुरवातच बसड्राईव्हरच्या नावाने केल्यामुळे तो मेसेज वाचावासा वाटला आणि त्यानंतर अंगाची लाहीलाही काय होते ते मला कळाले. गेल्या काही दिवसापासुन मुलींच्या बलात्कारांची छेडछाडीच्या बातम्या पाहत होतो. पण काही कारणांने त्या पुर्ण वाचता येणे शक्यच झाले नाही. राज्यातील छेडछाडी, बलात्कार, सुधारगृहातील मुलींचे पलायन, त्यानंतर आमच्या संस्कृतीसंपन्न डोंबिवलीतील बलात्कार प्रकरण, त्यानंतर मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रीया आणि त्यामध्येच दिल्लीती...