दुखाचा सुर्य मावळला...
दुखाचा सुर्य मावळला...
आजचा सुर्य
मावळला. मावळता सुर्य आपल्या सोबत अनेक दुख घेऊन गेला. २०१२ हे वर्षच तसं दुखात
गेलं. महाराष्ट्रावर तर अनेक संकटाचे पहाड कोसळले. अनेक सुखद घटना कमी आणि दुखाचे
सावट घेवुन आलेल्या या २०१२ ने आपल्याला फार काही दिले असे नाही. पण अनेक
महाराष्ट्राचे रत्न आपल्यातुन या कुटील डावाने हिरावुन घेतले. सिनेसृष्टीतर दुखाचे
सावटच होते. वर्षाच्या सुरवातीलाच कल्पना मोहन, रुबीना शेरगील, मोना कपुर, जॉय
मुखर्जी, अचला सचदेव सारख्या जेष्ठ तारकांच्या निधनाने २०१२ सुरु झाले. दिग्दर्शक
ओ.पी. दत्ता हे सुद्धा वृद्धापकाळाने गेले. मुंबईचे मा. पोलिस आयुक्त हसन गफुर
यांचे हद्यविकाराने निधन झाले. हसन गफुरांच्या निधनांने मुंबई पोलिस हादरले
शिस्तप्रिय आणि आपल्या पोलिसांवर प्रेम करणारा अधिकारी इतक्या लवकर जाईल असे कदापि
कोणालाच वाटले नव्हते. त्यानंतर सगळे हळहळले ते रसना गर्ल तरुणी सचदेवच्या अपघाती
निधनाने याच मे महिन्यात बॉलीवुडचा बॉडीबिल्डर व्हिलन असणारा गॅव्हिन पॅकर्ड हा
दिर्घ आजाराने आपल्यातुन गेला. याच मे महिन्यात अध्यात्मात गुरुचे महत्व जगाला
सांगणारे व त्याच बरोबर १२०० कोटी संपत्तीचे धनी असणारे ११६ वर्षाचे जय गुरुदेव
सुद्धा मथुरामध्ये वृद्धापकाळाने निर्वतले. बॉलीवुड बरोबरच अध्यात्माला सुद्धा
काळाने झटके दिले.
वर्षातले
सहामहिने गेल्यानंतर जुलै महिन्यात असे वाटले की आता तरी चांगल्या बातम्या ऐकायला
येतील तर तितक्यात रामायणात हनुमानाची लक्षवेधी भुमिका करणारे सर्वाचे आवडते
दारासिंग यांचे निधन झाले. बॉलीवुडचा पहिला सुपरस्टार असणारा राजेश खन्ना यांचा
गेल्या कित्येक महिन्यापासुन कर्करोगाशी सिलसिला चालु होता पण काळाने आपला डाव
साधला आणि या पहिल्या सुपरस्टारला आपल्यातुन हिसकावुन घेतले. बॉलीवुड बरोबरच
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाने सुद्धा अनेक प्रतिष्ठीत चेहरे गमावले.
सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेतील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचे
वृद्धापकाळाने निधन झाले तर महाराष्ट्रातील पाणीवाली बाई मृणाल गोरे यांचे सुद्धा
अल्प आजाराने निधन झाले आरपीआयच्या आठवले गटाचे प्रितमकुमार शेगांवकर या माजी
मंत्र्यांचे सुद्धा हद्यविकाराने निधन झाले जुलै महिना नेते आणि अभिनेते यांना
दुखात टाकणाराच होता.
ऑगस्ट
महिन्याची सुरवात झाली. आणि १५ ऑगस्टच्या पुर्व संध्येलाच महाराष्ट्राचे
माजीमुख्यमंत्री व सदैव हसतमुख असणारे असे विलासराव देशमुख ज्यांनी देशात पहिल्यादांच
राज्यात गुटखाबंदी करुन दाखवली अशा राजयोगी नेत्याचे निर्वाण योग्यवेळी अवयव न
मिळाल्याने झाले. त्यांच बरोबर राष्ट्रवादी कॉगेंसचे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय
खानविलकर यांचेही याच ऑगस्टमध्येच निधन झाले. चरित्रअभिनेते ए.के.हंगल याचेही याच
महिन्यात निर्वाण झाले राजेश खन्नाच्या अंतिमसंस्काराच्या वेळेस उलथुन पडलेला एकही
सुप्रसिद्ध अभिनेता ए.के.हंगल यांच्या अंतिमसंस्काराला उपस्थित नव्हता. सप्टेंबरच्या महिन्यात देशात धवलक्रांती घडवणारे
अमुल हा खेड्यातला ब्रॅण्ड जगभर सुप्रसिद्ध करणारे वर्गीस कुरीयन यांचेही वृद्धापकाळाने
निधन झाले. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख के.सुदर्शन यांचेही याच महिन्यात
निधन झाले. भारतातील जादु जगभर प्रसिद्ध करणारे के.लाल या जादुगाराला सुद्धा भारत
याच महिन्यात मुकला. दुखाची आसवं कमी होते न होते तोच ऑक्टोबर महिना उजाडला
बॉलीवुडला सर्वात मोठा झटका बसला तो सुप्रसिद्ध दिग्दर्शक व रोमान्सचा बादशाह यश
चोप्राच्या मुत्यूने. डेंग्यू सारख्या आजाराने सिनेसृष्टीने आपल्या यशा मागचा खरा
यश गमावला. तर आपल्या चुटकुल्या व विनोदाने हसवणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेता जयपाल
भट्टी यांचे सुद्धा कार अपघातात निधन झाले. आता या पुढे सरकारवर विबंडनात्मक टिका
करणारा अभिनेता आता कतीही महागाई झाली तरी दिसणार नाही .हेच काय ते एकमेव सत्य.
बॉलीवुड बरोबरच सिनेप्रेमी दुखातच होते पण काळाने ऑक्टोंबर अभिनेत्यांसाठी तर
नोव्हेंबर नेत्यासाठी राखुनच ठेवला होता असे जणु खरेच झाले. नोव्हेंबरच्या
सुरवातीलाच महाराष्ट्र बाळासाहेबांच्या आजारापणाच्या चितेंत होता. पण ज्या
गोष्टींची सर्वानांच भिती होती असा अप्रिय घाला काळाने घातला आणि महाराष्ट्राच्या
स्वातंत्र्यापासुन महाराष्ट्राला आपल्या विचारांनी धारधार दिशा देणारे मा.
बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाची अखेर झाली. एका निष्कपट पुण्यवंताचे महानिर्वाण
झाले. विलासराव देशमुखांच्या निधनांचे सावट कमी होते ना होते तेच इतका मोठा झटका
महाराष्ट्राला बसला. महाराष्ट्र बाळासाहेबांविना पोरका झाला. याच महिन्यांत देशाचे
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचेही निधन झाले. के.सी.पंथ, कैलासपती मिश्रा,
व किनजराप्पु नायडु यांसारखे भारतीय नेतेसुद्धा यांच महिन्यात काळाच्या पडद्याआड
झाले. महाराष्ट्राबरोबरच देशावर हि दुखाचे सावट पसरले. संपुर्ण देश दुखात होता.
यातच डिसेंबर महिना उजाडला. देशाची अब्रुची लफ्तरं वेशीवर टागंल्या गेली दिल्लीत
एका विद्यार्थीनीवर चालत्या बस मध्ये सामुहीक बलात्कार झाला. आणि ही तरुणी
डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात सिंगापुरच्या इस्पिताळात मुत्यूमुखी पडली. याच
महिन्यात मराठी चित्रपट सृष्टीवर मोठा आघात झाला तो पेंडसे आणि अभ्यंकर या दोन
मराठी सिनेकलाकारांच्या अपघाती मुत्यूने अशा या २०१२ च्या वर्षात देशाबरोबरच
महाराष्ट्रावरही अनेक दुखद संकट कोसळली. आज हा ब्लॉग लिहीण्याचे मुख्य कारण हेच
की, या सर्व व्यक्तीस आपण श्रद्धांजली देऊया. येणाऱ्या पुढील वर्षात परमपिता परमेश्वरांकडे
आपण हे असे दुखांचे वर्ष पुन्हा न येऊ दे.. अशीच विनंती करुन या सर्व व्यक्तीस
आदरपुर्वक प्रणाम करुया..











Comments
Post a Comment