मारुनच टाका पोलिसानां.....!!!
मारुनच टाका पोलिसानां..... !!! संतश्री सदगुरु विश्वात्मा महात्मा स्वर्गीय. लख्खनभैय्याजी यांचा एन्काउंटर केल्या मुळे आपल्या पोलिसदलातील पोलिसानां फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय असं वाचण्यात आलं. मी तर म्हणतो देताच कशाला या पोलिसानां शस्त्र. सर्वात सोप्पा पर्याय पोलिस खातेच बरखास्त करा आणि स्व.शाहिद आझमी सारखे किंवा मझिद मेमन सारखे नाही तर स्व.लख्खन भैय्या सारख्या ह्यात असणाऱ्या समाजसुधारकानांच सांगा आता आमचे संरक्षण करायला. उगीच नसता भार सरकारच्या डोक्यावर कशाला ? आता कार्यरत असणाऱ्या पोलिसानां सांगा या सारख्याच्यां हाता खाली काम करा. कारण 12 – 12 तास काम करण्याची पोलिसानांच सवय आहे ना.. म्हणुन... !! नुकतीच सरकारी वकीलांनी मागणी केलीय की, लख्खनभैय्या एनकाऊन्टंर प्रकरणी पोलिसानां फासावर लटकवा. मी तर अशी मागणी करतो की, ज्या सरकारी वकिलानीं अशी सुयोग्य मागणी केली त्याच्य...