हा काय, जागतिक महिला दिन..???
हा काय , जागतिक महिला दिन.. ??? आज काय जागतिक महिला दिन. सर्वत्र नारी शक्तीचा जयजयकार. प्रत्येकाच्या फेसबुकच्या वॉलवर महिलानां शुभेच्छांचे आकर्षक ग्राफिक्स.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्यां वॉलवर आपल्या नेत्यांची आणि त्यांच्या पत्नीचे छायचित्र. स्त्रीशक्तीचा जागर आणि महिलांबद्दलचा आदर इत्यादी. गेल्या अनेक वर्षापासुन आपण हेच करतोय. गेल्या अनेक वर्षापासुन माझे फेसबुकचे खाते कार्यान्वित आहे. दर वर्षी महिलांचे प्रेम जागतिक महिला दिनांच्या दिवशी आणि मातृदिनांच्या दिवशीच उफाळुन येते. एखाद्या व्यक्तीचा आवडलेला ग्राफिक्स लगचेच शेअर करायचा किंवा स्वताः अपलोड करुन आपल्या वॉलवर टाकायचा इतकेच. मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर याच दशकातील एखाद्या महिलांचे छायचित्र टाकायचे आणि आपला महिला दिन साजरा करायचा. मागच्या वर्षी सुद्धा हाच सुळसुळाट होता. हाच भंपकपणा होता. पण गेल्या 365 दिवसात काय झाले. या छायचित्रांत बद्दल झाला ? नाही . तेच छायचित्र त्याच शिळ्या चारोळ्या आणि त्याच काव...