मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

मी मोदी भक्त नाही. तरीही मोदींनी इस्रो प्रमुखांना जवळ घेऊन मारलेली मिठी अनेकांना खुपली त्यावर काहीनी जावईशोध लावले. वर इस्रोच्या प्रमुखांना हे शोभत नाही, पदाला साजेसं राहावं अशा शहाणपणाचे डोस अनेकांनी फेसबुकवरुन त्यांना पाजले. त्याही उप्पर जाऊन अमेरीकेत मोहिमा अयशस्वी झाल्यावर नासा प्रमुख रडत नाही अशी थुकरट उदाहरण ही देऊन झाली आणि अनेक अंधळ्या मोदी द्वेषींनी हेच सडके विचार सरसकट शेअर केले.
    मोदींच्या धोरणांना, विचारधारेला विरोध करणं हे सशक्त लोकशाहीच्या जिवीताचं लक्षण आहे पण म्हणून सरसकट उचलली जीभ लावली टाळ्याला असं करुन स्वताचं हसं करुन घेण्यात कसली आली धन्यता?
    मोदी इस्रोच्या कार्यालयात मोदी कुटुंबियांचे किंवा भाजपचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते. ते देशवासियांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोहिम अयशस्वी झाल्यानंतर आपण सगळे हिरमुसलो पण प्रत्येकाला त्या शास्त्रज्ञांबद्दल अभिमान वाटला, मला सांगा कोणाला अभिमान नाही वाटला?  मग जर मोदींनी तिथे जाऊन त्यांना मिठी मारली, त्यांचे अश्रु पुसले, त्यांना धीर दिला तर तर काय चुकलं ? तुम्ही जर तिथे असता आणि तर तुम्ही काय केलं असतं?
    आपल्या देशाला एक संस्कृती आहे, आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला संवेदना असतात. (ज्या देशांना संस्कृती नाही त्यांची प्रकृती कशी आहे हे वेगळं सांगायला नको) त्याच संवेदनातून इस्रोप्रमुखांना अश्रू अनावर झाले त्यांचे डोळे पुसण्याचं काम मोदींनी केलं तर काय बिघडलं? ज्यामोहिमेवर दिवसरात्र काम केलं ती अयशस्वी झाली तर रडू येणार नाही तर हसू येईल का?
    नासाप्रमुख मोहीमा अयशस्वी झाल्यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडल्याच्या चित्रफीती पाहिल्या नाही असा दावा काही मुर्खांनी केला, त्यांना मला एकच सांगायचंय, लांगुलचालनेला काही मर्यादा असतात. परकीय चाटूगिरी बंद करा. बापाचं नाव मुलांना आई सांगू शकत नाही अशा देशांचे अनुकरण करायचे? त्यांनी केलं तेच जर आम्ही करायचे असं इस्रोनं ठरवलं असतं तर चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर आपण पोहचू शकलो नसतो.
इस्रो प्रमुखांना अक्कल शिकवणाऱ्यांनां कागदाचं विमान तरी उडवता येतं का?
    भाजप-मोदी-सत्ताधारी यांना विरोध करुच की, त्यासाठी नोटाबंदी, आर्थिकमंदी,जीएसटी यासारखे अनेक विषय आहेतच की, यावरुन सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यासाठी  अख्खं आयुष्य पडलंय, पण त्यासाठी वेळ महत्वाची याचं भान असलंच पाहिजे.
बरं, हे वाचत असतांना मी पण भक्त झालो की काय असं वाटत असेल तर खुशाल वाटू द्या. मोदीभक्तांनी मला किती शिव्या घातल्या हे त्यांना आणि मला चांगलं माहित आहे त्यामुळे मी वेगळं स्पष्टीकरण देणार नाही.
आपला
स्नेहिल शिवाजी

Comments

  1. खुप छान मि सुद्धा हा विडीओ पाहुन शास्त्रज्ञांना नाही तर मोदींनाच टोकत होतो पन तुमच्या लेखामुळे काही प्रमाणात माझे ही मत परिवर्तन झाले. म्हणजे मि मोदी भक्त झालो असे नाही. त्याच्या. अयोग्य व अकार्यक्षमावर टिका करणारच पन नेहमीप्रमाणे केलेली व कालची "दादु कि झप्पी" ही वेगळीच होती

    ReplyDelete
  2. खुप छान मि सुद्धा हा विडीओ पाहुन शास्त्रज्ञांना नाही तर मोदींनाच टोकत होतो पन तुमच्या लेखामुळे काही प्रमाणात माझे ही मत परिवर्तन झाले. म्हणजे मि मोदी भक्त झालो असे नाही. त्याच्या. अयोग्य व अकार्यक्षमावर टिका करणारच पन नेहमीप्रमाणे केलेली व कालची "दादु कि झप्पी" ही वेगळीच होती

    ReplyDelete
  3. बरोबर. रिकामटेकडे लोक काहीही उगाळत बसतात.

    ReplyDelete
  4. दुनियेत मोदि जिथे तिथे सर्व जिंके. असा भास पहिल्यांदाच तुटला..पण हारून सुद्धा मोदींनी स्वताला प्रसिद्धि साठि भारतीय शास्त्रज्ञांच्याच माथे असफलतेचं खापर फोडलं आणि असं दाखवून दिले कि ईस्तरो अध्यक्षांनी खुप मोठी चूक केली पण बाळा मी माफ केलं तूला बघा दुनिया मी किती मोठा आहे.खरच ईस्तरो अध्यक्षांची चूक आहे का फक्त?? . निसर्गाच्या पुढे आजपर्यंत कुणाची ना चालली न चालेल.हा मोदि विमानातून जगप्रसिध्दिसाठि फिरत असतो त्या स्व प्रसिद्धिवेड्याला सांगावं कि त्याच विमानातून खाली पाहिले कि माणूस दिसत नाही हिच त्याची औकात...मोदिची हि रिवर्स काउंटडाउन ची हि सुरूवात आहे.बाकि कहि नाहीं

    ReplyDelete
  5. लेख वाखाडण्याजोगी आहे...

    बेधडक आणि उदाहरणासहीत विश्लेषण

    ReplyDelete
  6. very Well Said, it's important to understand the Work, the Dedication done by India (ISRO), than to comment negatively.
    #respect ISRO
    # respect INDIA

    ReplyDelete
  7. Each and every point is worth reading snehil .
    It is important to bring in light
    What is essential to be focused as per situation .
    People should understand being kind at heart and encouraging our scientist was natural reaction which Honourable PM.Modi ji has given .
    Kontya deshanche anukaran karayche he hi lokanna samjle pahije.
    The efforts of ISRO itself shows India is Still A WINNER.
    Well said snehil. #respectISRO
    #RespectIndia

    ReplyDelete
  8. Each and every point is worth reading snehil .
    It is important to bring in light
    What is essential to be focused as per situation .
    People should understand being kind at heart and encouraging our scientist was natural reaction which Honourable PM.Modi ji has given .
    Kontya deshanche anukaran karayche he hi lokanna samjle pahije.
    The efforts of ISRO itself shows India is Still A WINNER.
    Well said snehil. #respectISRO
    #RespectIndia

    ReplyDelete
  9. स्नेहिल साहेब मला काय तुमच्या tv9 मधे कामाला नाही लागायचं.किंवा तुमचं मन दुखु नये म्हणून संबंध बिघडू नये.कधी अडचणीत तुम्ही कामि येतील म्हणून फुकटची तारिफ करणार्या मधला मी नव्हें.१५लाख तुमच्या अकाउंट मधे मोदिनी पाठवले असतील.भारतातल्या १५० करोड लोकांच्या आशा भावना दुखावल्या तेंव्हा असाच ब्लोग लिहिला का?.बेरोजगारीचा उच्चांक ७० वर्षातला वाढला,G.D.P निच्चांक झाला आहे?काळा पैसा आला नाही,दाउद आला नाही,कंपन्या बंद होत आहेत.नोटबंदि मधे १०लाख कोटि पैसा कोणाचा पांढरा झाला.R.B.I ?म्हणते.खरं बोलणारे TV channels बंद केले आहेत जबरदस्तीने,... खोटे आरोपांमधे लोकांना देशद्रोही ठरवलं जातं... बरेच काही तेंव्हा तुम्ही असाच ब्लोग लिहिला का? ...तुमचा एखादा भाऊ उच्च शिक्षण शिकून भजीपाव ची गाडी लावली असती तर असा ब्लोग लिहिला नसता....का हे समजावं .."जिधर बोजा उधर सोजा"! तुम्ही मिडिया वाले आहात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे.. तुमच्या कडून निराशा झाली अपेक्षित नव्हती.मर्दाची औलाद असाल तर सत्याची साथ द्याल...अशा भिकारडयांना घाबरू नका आम्ही सोबत आहोत.

    ReplyDelete

Post a Comment