पिस्तुल रक्तरंजितच....
पिस्तुल रक्तरंजितच....
|
पिस्तुल
|
हे परवानाधारक असो की, नसो त्यातुन
नुकसानच होते. सध्या गाजत असलेल्या वर्षा भोसले आत्महत्या प्रकरणांने चांगलाच जोर
धरला आहे. दस्तुरखुद्द जेष्ठपार्श्वगायिका आशा भोसले यांनी वर्षा भोसलेनी
आत्महत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे एक दोन नव्हे तर चक्क तीस वर्षापुर्वी
हरवलेले आहे असे सांगितले मग इतक्यावर्षापुर्वी हरवलेले पिस्तुल चांगल्या स्थितीत
कसे बरे होते की, चक्क त्यातुन २ गोळ्या निघाल्या. ३० वर्षापुर्वीपासुन हे घातक
शस्त्र आशा भोसलेच्या घरांवर डोळा ठेऊन होते हेच काय ते सत्य. आज स्वंरक्षणासाठी
घेतलेल्या पिस्तुलातुन स्वंरक्षण करण्यापेक्षा घातच जास्त झाले. काही दिवसापुर्वी
वर्षा भोसलेनीं आत्महत्या केली म्हणुन आता या पिस्तुलाचा विषय निघाला पण आजवर
यामधुन मोठया प्रमाणात घातच झाले आहेत.
पिस्तुल
खरेदी करणे म्हणजे कुण्या सोम्यागोम्याचा खेळ नाही. परवानाधारक पिस्तुलासाठी
आयुक्तांपासुन थेट मंत्र्यापर्यत जाण्याची वेळ येते. सहजच परवाना मिळत नाही. मग
वशिलेबाजीच्या जोरावर ‘काय “द्या” ने चालत’ हा परवाना ४ ते ५ लाखाच्या घरात जातो आणि
मग पिस्तुलांची किंमतच जवळपास ३ ते ४लाखांपर्यत जाते तरीही श्रीमंत धनिक ते सहजच
खरेदी करतात. आणि मृत्यूला जवळपास घेऊन फिरतात . मागे घाटकोपरला एका सोनाराच्या
दुकानात दरोडेखोर घुसले त्याने तावातावत पिस्तुल काढले पण त्याचा डाव फसला आणि
पिस्तुलात गोळी अडकली ती गोळी बाहेरच आली नाही पण दरोडेखोरांच्या गोळीने आपला नेम
अचुक साधत त्या सोनाराच्या छातीचा थेट वेध घेतला. त्यात त्याचा जीवपण गेला आणि
संपुर्ण दुकान मुद्देमालासह लुटल्या गेले. स्वंरक्षनांसाठी घेतलेल्या पिस्तुलाने
काय मागे ठेवले ??
याच
पिस्तुलाने अनेकांचे आयुष्य बरबाद केले कुणी आपल्या नातेवाईकांवरच गोळ्या झाडल्या
तर कुणी शुल्लक कारणांवरुन गोळीबार करत स्वताःचेही आयुष्य बरबाद करुन घेतले.
कुलाबा येथील व्यावसायिकाने तर संपुर्ण कुटुबांवर मालमत्तेच्या वादातुन गोळ्या
झाडल्या तर दादरच्या एका ज्वेलर्सच्या मालकाने पत्नीची छेड काढणाऱ्या मुलांवर
गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वताः तुरुंगात जाऊन बसला काहीमहिन्यांपुर्वी
कळव्यात काकाने स्वतः आपल्या तरुण पुतण्यांवर गोळ्या झाडल्या त्यामध्ये एकाचा
मृत्यू झाला. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत
भाजपचे
जेष्ठनेते प्रमोद महाजनांची हत्त्या त्यांचा भाऊ प्रविण महाजन केली पण केली कशी? तर पोटात धडाधड गोळ्या घालत आणि हेच पिस्तुल प्रमोदजींच्याच
कृपाशिर्वादाने त्याला मिळाले होते. मोठ्या भावाला गोळ्या
घालुन ठार मारल्यानंतर चांगल्या कुटुंबाची वाताहत स्वताःच्या हाताने करुन घेतली. याच मुळे प्रविण महाजन यानां
जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्याच विचारातुन त्यानां ब्रेन हॅमरेजचा झटका बसला आणि
त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. हेच काय कमी होते कॉग्रेसचे नेते केशव भोसले
यांनी तर आपल्याच तरुण मुलांची परवानाधारक पिस्तुलाने हत्या केली होती आणि नंतर
त्यानी असे निवेदन ही दिले होते की, रागाच्या भरात मी ज्यानां आपल्या
हाताखांद्यावर खेळवले त्यानांच मारण्याची दृबुद्धी मला पिस्तुल असल्यामुळेच झाली.
ज्याचां स्वताःच्या रागावर आवर नाही त्यांनी तर पिस्तुल जवळ बाळगुच नये व ते
घेण्याचा विचारही करु नये. आजवर गँगवॉरमुळे झालेल्या हत्त्या मध्ये जे जे मारले
गेले त्यासर्वाकडे लोडेड पिस्तुलं सापडली परंतु प्रतिस्पर्धानी ती चालवायची संधीच
त्यानां दिली नाही. मग पिस्तुल जवळ बाळगण्याचा उपयोगच काय?



Comments
Post a Comment