मुत्यूदंड कसाबचा....
झालीच. झाली एकदाची कसाबला फाशीची शिक्षा झाली. आता पुढे काय ? फाशीची शिक्षा सुनावलेल्या देशातील ३०९वा कैदी. आणि शिक्षेची अंमलबजावणी झाली तर ५२वा कैदी. पण स्वातंत्र्यानंतर आजपर्यत फासावर इतक्याच कमी लोकानां फाशी झाली म्हणुन तर भारतात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी फोफावली. पण जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात त्याप्रमाणे या मुत्यूदंडाला ही घणघणीत आणि प्रभावी अशा दोन भक्कम बाजु आहेत. आज भारतात मानवी हक्क समितीवाल्याचां बाजार मोठ्या प्रमाणात ठाण मांडुन बसला आहे. काही झाले तरी ‘मानवतेचा दुष्टिकोन’ आणि ‘मानवी हक्कांचे उल्लंघन’ या मुद्दयावर मिडीयाचे कॅमेरे गरम करायचे व अल्पावधीत फेमस व्हायचं असा जणु चंगच या मंडळीनी बांधला असावा. कसाबला फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि त्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या मनात एकच सवाल फाशी कधी...??
आता, कसाबच्या फाशीची कधी अंमलबजावणी होणार यावर मोठं प्रश्नचिन्ह पण मुत्युदंड हाच एकमेव पर्याय आहे का? किंवा मानवतेच्या दुष्टिकोनात त्याला सुधारणेची एखादी संधी द्यावी व भारताचे आधार कार्ड देऊन त्याला सुधारण्यासाठी व पोटापाण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ करुन द्यावा. युवा बेरोजगार योजनेतंर्गत त्याला एखादे दुकान काढुन द्यावे व आणि इंदिरा आवास योजेनेतुन किंवा मुख्यमंत्री कोट्यातुन एखादे घर पास करावे आणि त्याला सुधारण्याची संधी देऊन त्याला भारताचे सुजाण नागरीकत्व बहाल करावे. त्याच बरोबर त्याला त्याच्या सुद्र्ढ आरोग्य जपण्यासाठी राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ द्यावा. राशनपाण्यासाठी मराठी हद्यसम्राट राजसाहेब ठाकरेनीं तर त्याच्या नावे मागच्या निवडणुकांमध्ये राशनकार्ड काढलेच आहे तेव्हा ते लवकरात लवकर चालु करावे.
अशा या आंतकवाद्यांमुळे देशावर हल्ला झाल्यानंतर इंडियन इंटीलिजिन्स ब्युरो, रॉ आणि गुप्तचर यंत्रणाचे दात पडतात. आपला कायदाच एवढा ढिसाळ आणि सुस्त की काही विचारायलाच नको. ते गेंड्याच्या कातडीवर जसं शेवाळ साचतात तसे कायद्यावर नेत्याची आणि त्यांच्या व्होट बँकची हिरवी शेवाळ चिकटली आहे. आणि यामुळेच अशा प्रकारचे हल्ले होतात. आणि निष्पांपाचे प्राण जातात. आता हा मुद्दा झाला तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा पण देशांतर्गत गुन्हेगार काय कमी आहेत. बाप पोटच्या मुलीवर बलात्कार करतो. लहान लहान मुलींवर बलात्कार करुन त्यांची सिरीयल किलिंग होते, घरात घुसुन लोकांची हत्या केली जाते. कुठे गोळ्यांचा वर्षाव तर कुठे तलवार आणि चाकुचे सपासप वार कुठे आहे. आहे कुठे? कायदा आणि सुव्यवस्था? आज किती मोठ्या प्रमाणात माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्या होतात. सगळचं ये रे माझ्या मागल्या... आणि यामुळे भारतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचा निश्चितच परीणाम भारताच्या विकासावर होतो. फाशीच हा एकमेव पर्याय असु शकतो का गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तर होय. आज जो तो कायदा हातात घेतो आपल्या खिशात कायदा असल्या सारखा वावरतो. आणि आपल्या महामहिम माजी राष्ट्राध्यक्षांनीं अट्टल निर्घुण खुण करणाऱ्याला व लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या २२ गुन्हेगारानां त्याच्या कारकिर्दित फाशी माफ केली. पण ज्यानां ज्यानां फाशीची शिक्षा सुनावली त्या सगळ्यानां फाशीची अंमलबजावणी झाली तर कदाचित उद्याचे चित्र वेगळेच असु शकते. उद्या जर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला आणि ए.राजाला फासावर लटकवला तर यापुढे भारतातला कोणताच मंत्री भ्रष्टाचार करणार नाही. दहशतवाद्याचीं आपल्या देशाकडे बघण्याची हिम्मत होणार नाही व विकसित देशाच्यां रांगेत उभा असलेला विकसनशील भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल. ज्या प्रमाणे धनजंय चटर्जीला फाशी झाली. त्याप्रमाणे जर प्रत्येक क्रुर बलात्काऱ्याला व खुण्याला फाशीची शिक्षा झाली तर उद्या भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित.

Comments
Post a Comment