सुरवात...
नमस्कार , मी स्नेहिल शिवाजी;
ओळखलत..!!
आपण यापुर्वी ऑरकुट, फेसबुक, आणि ट्विटर च्या माध्यमांतुन कायम संपर्कात
होतो, आहोत आणि कायम राहु. पण या मध्ये सातत्य नव्हते हे ही तितकेच खरे....
परंतु त्यात कायमचा खंडही नव्हता. ऑरकुट आणि फेसबुकच्या माध्यमांतुन अनेक
चित परिचित, वेगवेगळ्या विचारांचे सख्ये, सोबती मिळत गेले. काही कायमचे
स्मरणात राहिले तर काही खिडकीवर बसणाऱ्या कावळ्यासारखे आले आणि डोकावुन
गेले. प्रत्येकांचे आपले विश्व असते त्यात ते रमले. या माध्यमांतुन
माहाजालावर माझे एक विश्व निर्माण झाले.. कित्येकांचे विचार
ऐकले, वाचले, पाहिले तर अनुभवले सुद्धा. काही समर्थनार्थ विचार होते तर
काही विरोधी होते पण आपण कायम सगळं
स्विकारुही शकत नाही व कायम सगळं नाकारुही शकत नाही. ऑरकुट, फेसबुक, आणि
ट्विटर म्हणजे एका वाक्यातील ब्रेकींग न्युज... आणि मग त्यामध्ये
प्रत्येकांच्या विचारांची देवाणघेवाण म्हणजे न्युज चॅनेलच्या स्क्रिनवर
येणारी न्युज फ्लॅश
.
यासगळ्या माध्यमात माझ्या मते विचारांची सखोल देवाणघेवाण फार कमी होत
होती. म्हणुनच मला माझे विचार, माझा निर्णय, माझे मत, माझी दिशा, माझा
मार्ग, माझे अनुभव, माझ्या समस्या, आणि स्वता मला तुमच्या समोर यायचे होते..
म्हणुनच अनेक दिवसांपासुन माझ्या मनात सुरु असलेली ब्लॉगची संकल्पना आज सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतोय.. तेव्हा या पुढे मी सर्वोतोपरीने आपल्या बरोबर ब्लॉगच्या माध्यमातुन सातत्याने संपर्कात राहिन.माझ्या या ब्लॉग द्वारे माझे विचार कायम आपल्या पर्यंत पोहचवण्याचा माझा प्रमाणिक प्रयत्न राहिल. यामध्ये मी मांडलेले विचार प्रत्येकाला भावतील किंवा रुचतील असे नाही. किंवा माझे विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही. माझ्या भुमिका माझे विचार काहीअंशी पुरोगामी असल्यामुळे बदलतीलही. मी मांडलेलं माझे मत कायम राहिल असे नाही. माझ्या टिका किंवा समर्थन या त्या त्या विषयांपुरत्याच मर्यादित असतील. तेव्हा जर माझ्या या ब्लॉगवर मी लिहीलेल्या लेखणीने जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी त्यांची आज ब्लॉगला सुरवात करण्यापुर्वीच माफी मागतो.ब्लॉगच्या या लिखाणात माझ्या असंख्य शुद्धलेखणाच्या चुकासुद्धा होणार तेव्हा क्षमस्व ! मला जसे तुम्ही कायम तुमच्या सोबत ठेवले तसेच कायम माझ्या बरोबर रहा.. हिच प्रबळ इच्छा...
धन्यवाद ...!!!
स्नेहिल शिवाजी..

Comments
Post a Comment