मिल्क मॅन ऑफ इंडीयाला मानाचा मुजरा...



अमुल
चे प्रणते वर्गीस कुरीयन. वर्गीस कुरीयन याचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ साली केरळातील कलिकत या खेड्यातील एका मध्यमवर्गीय सिरीयन ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे पिता पुथेनपरक्कल कुरीयन हे कोची मधील विख्यात शल्यविशारद होते तर आई उच्चविद्याविभुषित होती. भारतीयानां शिक्षित करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या धोरणांचा पुरेपुर उपयोग कुरीयन कुटुंबाने करुन घेतला. सुरवातीला त्यानां लष्करात जावयाचे होते पण आईच्या विरोधामुळे त्यांनी मद्रास मधील लॉएला महाविद्यालयातुन १९४० महाविद्यालयीन शिक्षण शास्त्र शाखेतुन पुर्ण केले. लॉयला महाविद्यालयातुनच पदार्थ विद्यान शाखेत बी.एस्सी.ची पदवी घेतली. त्यामध्ये ते विद्यापिठातुन ७ वे आले.  त्यानंतर गिंडीच्या महाविद्यालयातुन अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडीलांचा अकस्मित मुत्यू झाला. १९४४ साली वर्गीस कुरीयन यांनी टाटा आर्यन अँण्ड स्टील कंपनी मध्ये पदवीधर म्हणुन नोकरीसाठी रुजु झाले त्यानंतर १९४६ साली त्यांनी जमशेदपूर येथील टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिटुट मधुन पुन्हा पदवी मिळवली. शिक्षणाबरोबरच टेनिस, बॅटमिटंन, क्रिकेट व बॉक्सिंग या खेळांमध्ये त्यानां विशेष रस होता. शिक्षणात सर्वात पुढे असणाऱ्या वर्गीस कुरीयन यानी मेटलर्जी किंवा न्यूक्लिअर फिजिक्स या विषयात उच्च शिक्षणासाठी १९४८ साली परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल केला. परंतु सरकारच्या शिष्यवृत्ती निवड समितीने त्यांना दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकी मध्ये शिष्यवृत्ती देऊ केली. यापुर्वी पुर्व शिक्षण म्हणुन त्यांना इंपीरियल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये प्राथमिक अभ्यासक्रमांसाठी आठ महिने पाठवण्यात आले. त्यानंतर संधीचा पुरेपुर वापर करत त्यांनी मास्टर ऑफ सायन्स इन मेटालुग्रिकल इंजिनिअरींग या शाखेचा मिशिगन विद्यापिठातुन अभ्यासक्रम विशेषश्रेणीत पुर्ण केला.त्याचा यशाचा आलेख हा कायम स्वरुपी चढताच राहीला. परदेशातुन उच्चशिक्षण घेऊन परतल्यावर त्यानां सरकारने आंनद येथे पाठवले तिथे कैरा जिल्हा दुध संघ प्रगतीच्या अपेक्षेत तिष्ठत उभा होता.
                 १९२९च्या काळात दुधाच्या उत्पादनांवर पोस्टल नामक कंपनीची मक्तेदारी होती. कंपनी विदेशी असल्यामुळे नेहमी दुधाचे दरांत चढउतार होत होती. सतत दुधांचे दर बदलत असल्य़ामुळे शेतकरीवर्गात कमालीचा रोष व राग होता. १९४६ च्या काळात कैरा जिल्हा- तील शेतकऱ्यांनी पुढाकार घेवुन सहकारी चळवळ सुरु केली. गावागावतुन खेडापाड्यातुन दुध गोळा केले जाऊ लागले. ध्येय एकच होते की, दुधाचे दर कायम स्थिर ठेवण्याचे. त्या दिशेने शेतकऱ्यांचे कार्य होत होते. त्यानां सहकार्य केले ते स्थानिक नेते त्रिभुवनदास पटेल यांनी आणि मार्गदर्शन केले ते लोकनेते सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आंनद को-ऑप.चळवळील सुरवात झाली. वर्गीस कुरीयन यांची सहकारी चळवळीला घडवण्यासाठी व आकार देण्यासाठी तेथे नेमणुक झाली.  शेतकरी आपले काम करत होते परंतु प्रभावी मार्गदर्शन करणारा व्यवस्थापकीय अधिकारी अद्याप त्याच्यां कडे नव्हता. याच काळात वर्गीस कुरीयन हे आपले उच्चशिक्षण घेऊन भारतात परतले होते. सरदार वल्लभभाईनीं वर्गिस कुरीयनयांची हुशारी ओळखुन त्यांना आनंद ला बोलवुन घेतले व तेथे सहकाराचा पाया रचला गेला. १३ मे १९४९ रोजी वर्गीस कुरीयन आंनद मध्ये प्रत्यक्ष कार्यरथ झाले.सुरवातीला त्यांचा पगार ६०० रुपये होता. टेक्निकल मध्ये प्राविण्य असणाऱ्या वर्गीस कुरीयन यानां सुरवातीला आनंद मध्ये फारसे काम नाही अशी भावना होती पण प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे वर्गीस कुरीयन हे शांत बसतील असे होणेच शक्य नव्हते. अनेक अडचणीनां आव्हाने समजुन वर्गीस कुरीयन आपले कार्य अतिशय कौशल्याने हाताळत होते. त्यानां मोलाची साथ होती ती शेतकऱ्य़ांच्या हिताशी अतिशय एकनिष्ठ आणि कमालीची सचोटी असणारे प्रामाणिक लोकनेते त्रिभुवनदास पटेल यांची त्याच्या मोलाच्या सहकार्यामुळे अनेक आव्हाने सहजी स्विकारण्यात त्यानां यश आले. दुध उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यानां संरक्षण मिळाले पाहीजे व त्यांच्या हातात त्याच्या हक्काचा घरचा पैसा खेळला पाहीजे या भावनेने त्यांनी हा सहकाराचा अविस्मरणीय इतिहास घडवला.
१९५० साली कैरा संघाच्या सरव्यवस्थापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतात म्हशींच्या दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात दुधांची पावडर भारतात आयात केली जात होती इतर राष्ट्रांमध्ये गाईच्या दुधापासुन ही पावडर बनवली जात होती. परंतु आपल्या देशात मोठ्या प्रमाणात म्हशीचे दुधांचे उत्पादन होत असुन ही आपण सुद्धा अशी पावडर म्हशीच्या दुधांपासुन बनवु असा त्यांनी ठाम निश्चय केला. परंतु सुरवातीला म्हशीच्या दुधांपासुन अशा प्रकारची पावडर बनुच शकत नाही असा अनेकानीं अंदाज बांधला. आव्हाने हसत हसत स्विकारणाऱ्या वर्गीस कुरीयन यांनी युनिसेफ ला आपली कल्पना सांगितली आणि युनिसेफने सुद्धा कुठलेही आढेवेढे न घेता यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व त्यानुसार काम सुरु झाले. प्लान्ट उभा राहिला. सोबतीला अद्यावत तंत्रज्ञ होतेच व दि्मतीला दुध उत्पादक शेतकरी ही होते. या सर्वाच्या मेहनतीला आणि प्रयत्नाला यश आले आणि जगाच्या पाठीवर पहिल्यांदा आनंद मध्ये म्हशीच्या दुधाची पावडर तयार झाली. युनिसेफ आवाक झाली. म्हशीच्या दुधांची ही पावडर क्रांतीचा नांदी ठरली. त्यावेळेस केवळ २०० लिटर दुधांचे उत्पादन होणाऱ्या कैराकडुन आता तब्बल २० हजार लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. वर्गीस कुरीयन यांच्या यशस्वी धाडसामुळे कैरा डेअरी आशियातील सर्वात मोठी डेअरी म्हणुन ओळखली जाते. याच कालवधीत वर्गीस कुरीयन यांनी आपल्या उत्पादनाला आंतराष्ट्रीय स्तरांवर ओळखले जावे यासाठी त्यांनी आपल्या दुधाचा ब्रॅड तयार केला.
कैरा जिल्हा सहकारी दुध उत्पादन संघ उत्पादित दुधाला नाव देण्यासाठी त्यांनी स्थानिकांची मते मागवली व त्यानुसार अमुल हे नाव पुढे आले. आनंद मिल्क युनियन लिमिटेड AMUL असा हा लोकांच्या सहजी पचनी पडेल असा ब्रॅन्ड १९५५ सालात तयार झाला. याचा अमुलचा संस्कृत मध्ये असा अर्थ होतो की, ज्याला मुल्य नाही असा अमुल्य हा या अमुलचा अर्थ. यामुळे अमुल हे नाव जिभैवर रुळायला फार वेळ लागला नाही. व अल्पावधीतच हे नाव लोकप्रिय झाले. कैरा जिल्हा दुध संघ लि. अमुल या ब्रॅन्ड नावाने ओळखले जाऊ लागले. अमुलच्या माध्यमांतुन शेतकऱ्यांचे उत्पादन शहरी भागांत पोहचु लागले. दिवसातुन २ वेळा दुध जमा करण्यासाठी लांबच लांब रांगा लागु लागल्या. उच्च व सोप्पं तंत्रज्ञान आणि प्रभावी वितरण व्यवस्था यांमुळे अमुलने चांगलीच बाजी मारली. शेतकऱ्यांनी दिलेल्या दुधाचे फॅट तपासुन त्यांना तत्त्काळ तिथेच पैसे दिले जात. या मुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळत राही. दुधांचे फॅट तपासल्या नंतर ते ट्रक मधुन गोळा केले जाते चिलर्स मधुन गेल्यानंतर पॅश्चराईस आणि सिलो केल्यांनतर पॅकेजिंग केले जाते. फिल्टरींगची व्यवस्था २४ तास आणि ३६५ दिवस अंखडपणे चालु राहते. अशा प्रकारे अमुल दुध हे सक्षम वितरणांद्वारे रोज भारतातील घरांघरात प्रांतकाळी येते.
१९६४ साली पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीनीं आणंद ला भेट दिली आणि वर्गीस कुरीयन यांचे कौतुक केले व असा सहकारी उपक्रम संपुर्ण भारतात राबवावा अशी इच्छा वर्गीस कुरीयन यांच्याकडे व्यक्त केली पंतप्रधानांच्या इच्छेचा आदर राखत त्यांनी त्यादिशेने काम करण्यास सुरवात केली पण स्पष्टवक्ते व अतिशय व्यवहारी असणाऱ्या कुरीयन यांनी दिल्ली पासुन दुर अशा जिथे कोणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही अशा आणंद मध्येच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाची स्थापना केली. भारतात दुधाची क्रांती आणणे हे एकमेव ध्येय कुरीयन यांचे होते. कुरीयन यांनी आपल्या या प्रकल्पाला ऑपरेशन फ्लर्ड हे नाव दिले. १९६५ साली त्यांनी ऑपरेशन फ्लर्डच्या अंमलबजावणीची प्रभावी योजना आखली. ही कल्पना जॅकपोट ठरेल असा त्यांचा विश्वास होता. याच कालावधीत युरोपात दुधाचा सुकाळ होता अतिशय कमी किंमतीला युरोपातील दुग्घ भारतीय बाजारपेठात दाखल होऊ लागले परंतु कुरीयन यांनी अमुलच्या किंमतीचा दरांत समतोल राखत हे परदेशी आव्हानं मोठ्या कौशल्याने स्विकारत आंणदचे मॉडेल जगापुढे ठेवले. त्याच धर्तीवर एक कोटी शेतकऱ्यांचे २०० डेअरी प्रकल्पांमध्ये २० दशलक्ष लिटर दुध घेतले जात होते. सप्टेंबर १९६५ मध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन अँक्ट,१८६० अन्वये एनडीडीबीची संस्था म्हणुन अधिकृत नोदंणी झाली. ऑपरेशन फ्लडच्या योजनेमुळे वर्गीस कुरीयन व त्यांचे सहकारी नुसते सळसळत होते.
ऑपरेशन फल्डच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर त्यात प्रमुख तीन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात देणगी म्हणुन मिळालेल्या दुग्धजन्य पदार्थांपैकी दुधाच्या भुकटीच्या दुधांमध्ये रुंपातर करुन त्यांचे वितरण मुंबई,दिल्ली,कलकत्ता आणि मद्रास इथल्या सरकारी दूध योजनांना करायचं. ते अशा पद्धतीने करायचं की, तिथल्या बाजारपेठावर मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण करता येईल. त्यानंतर दुधाच्या वितरणातून आणि देणगीरुपातल्या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रितुन जो काही पैसा मिळेल,त्याच्या वापर शहरातल्या जनांवरांच्या  निगराणी- करता, गर्भरेतनासाठी तसंच दुधाचं उत्पादन, संकलन आणि त्यावरच्या प्रक्रियेकरता वापरण्यात येईल हा दुसरा टप्पा होता आणि सरतेशेवटी ग्राहकपेठांमधल्या किंवा बाजारातल्या प्रमुख दूधयोजनांचं बस्तान नीटपणे बसवण्यासाठी या सगळ्या यंत्रणेचा वापर करण्यात येईल. हा तिसरा टप्पा होता अशा प्रकारे ऑपरेशन फ्लडच्या कार्याची विभागणी करण्यात आली होती. आणि ऑपरेशन फ्लड यशस्वी झाले. दूध उत्पादनाला देशाला स्वयंपूर्णता आली ती ऑपरेशन फ्लड मुळे आणि त्यातल्या सहकारी संरचनेमुळे हे ईप्सित सर्वार्थाने साध्य झाले आज देशातल्या २२राज्यांतल्या १.१ कोटी शेतकऱ्यांच्या मालकीचे २०० डेअरी प्लॅट्स आहेत आणि यांतून १.८ कोटी लिटर दुधांचा वापर केला जातो. हे निश्चितच स्पृहणीय आहे. १९६५ सालात मिशिगन विद्यापीठाने वर्गीस कुरीयन यांना मानाची डॉक्टर ही पदवी दिली.
१९६० सालापासुन अमुलनं तूप,चीज आणि मिल्कस्प्रेचं  उत्पादन करायला सुरवात केली. दुग्धव्यवसायात भरीव कामगिरी केल्यानंतर आपल्या कार्याद्वारे प्रकाशझोतात आलेल्या वर्गीस कुरीयन यांनी आणंद पॅटर्ण खाद्यतेलाच्या क्षेत्रातही वापरण्यास सुरवात केली. आणंद पॅटर्ण खाद्यतेलाच्या क्षेत्रात राबवायचा याचा अर्थ तेलबियांचे संकलन करायचं, त्यावर प्रक्रिया करायची आणि मग ते वनस्पतीजन्य तेल विक्रीसाठी  तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती सुपुर्त करायचं,असा होता. तेलबिया उत्पादक शेतकऱ्याचा या संपुर्ण यंत्रणेवर ताबा असावा असा मुख्य़ हेतू होता. व्यापारी आस्थापनेच्या नावांच महत्त्व ओळखुन त्यांनी धारा या नावाने हवाबंद पिशवीतील खाद्यतेल बाजारात आणले. यामुळे तेल सहकारी संस्थाच्या स्थानाला अधिकच बळकटी आले.अल्पावधीतच मालाचा दर्जा, विश्वासार्हता,निर्भळपणा आणि वाजवी किंमत  याकरता धारा ओळखलं जाऊ लागले.  १९९४ सालापर्यंत ५,३००४८ तेलबिया उत्पादक सहकारी संस्थाची उभारणी केला.सुमारे १० लाख शेतकरी त्यांचे सभासद आहेत. सात राज्यात मिळुन तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचे १९ संघ त्यांनी स्थापन केले आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या अनेक मोठया, अत्याधुनिक तेलगिरण्या उभ्या राहील्या.
           अमुल हे व्यापारी आस्थापनांचे नावाने अमुलला यशस्वी केले. दर्जा, वाजवी किंमत  आणि विश्वास अशी अमुलची त्रिगुणात्मक ओळख होती. अमुलच्या उत्पादनात वितरणांत आणि विक्रीकरीता त्यांनी देशभर जी यंत्रणा उभी केली होती तीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची खरी ओळख होती.अमुलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला डेअरी मध्ये सक्तीचे अर्धा लिटर दुध प्यावयास मिळते तसा आदेशच वर्गीस कुरीयन यांनी तेथील व्यवस्थापनाला दिला होता. वर्गीस कुरीयन यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यावर तसे प्रेमच आहे. घट्ट दुधांच्या निर्मितीच्या एका वादात वर्गीस कुरीयन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बाजु घेतली व स्विर्जलॅडच्या एका कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यानां खडे बोल सुनावत चांगलेच धारेवर धरले व आव्हान म्हणुन मिठाई मेट नावाचे घट्ट दुध तयार केले. अशा प्रकारे अनेक आव्हानं वर्गीस कुरीयन यांनी मोठ्या हिमतीने स्विकारली. याच कालावधीत युरोपात दुधाचा सुकाळ होता अतिशय कमी किंमतीला युरोपातील दुग्घ भारतीय बाजारपेठात दाखल होऊ लागले परंतु कुरीयन यांनी अमुलच्या किंमतीचा दरांत समतोल राखत हे परदेशी आव्हानं मोठ्या कौशल्याने स्विकारत आंणदचे मॉडेल जगापुढे ठेवले. त्याच धर्तीवर एक कोटी शेतकऱ्यांचे २०० डेअरी प्रकल्पांमध्ये २० दशलक्ष लिटर दुध घेतले जात होते. आर्थिक स्वावलंबनाची ही फार मोठी सुरवात होती. अपंग, विधवा अबला स्त्रीयां या सहकारी दुध संघाच्या जिवावर आपल्या संसाराचा यशस्वी गाढा आजही हाकत आहेत. वर्गीस कुरीयन यांचा सुरवातीचा मार्ग फार खडतर व नागमोडी वळणांचा होता. प्रशासनाचा विरोध वर्गीस कुरीयन यांनी खुबीने परतवला. आपल्या कामाला देव मानणाऱ्या वर्गीस कुरीयन यांनी आपल्या अफाट कार्याच्या व भन्नाट कल्पना शक्तीच्या जोरावर अनेक अशक्य आव्हाने पेलवली.
                कृषी क्षेत्रातील जंगलतोडीच्या विरोधात वर्गीस कुरीयन यांनी वृक्षरोपण केले.मीठाच्या उत्पादन करण्यासाठी त्यांनी सहकार तत्वावर मीठ उत्पादक शेतकऱ्यानां एकत्र करुन त्याच्या विकासासाठी प्रयत्न केला.त्याच बरोबर गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरु पदी त्यानी अनेक कामे पार पाडली तर गुजरात विद्युत महामंडळाचे काही वर्ष वर्गीस कुरीयन हे सदस्य होते.  ८० ते ९० च्या दशकात ग्रामीण भागातील होतकरु तरुणानां प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी ग्रामीण व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या शाखा उघडल्या त्याचा पसारा आज फार मोठा आहे. गुजरात कॉ-ऑप.मिल्क मार्केटींग फेडरेशन अमुलच्या नावाखाली करोडो शेतकरी  व दुध आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी करोडो गावकऱ्यानां एकत्र आणण्याचे व त्याच्यां मध्ये आपल्या कार्याचा आदर राखण्याचे उत्कृष्ट कार्य वर्गीस कुरीयन यांनी केले. आज अमुलचे उत्पादन, पॅकेजिंग, आणि सक्षम वितरण व्यवस्थेच्या जोरावर आज ८० डेअरी जगभरात वाहतुक, वितरण व आउटलेट्स इतका फार मोठा पसारा वर्गीस कुरीयन यांनी आणंद ला दिला व त्याच दिमतीत आज अमुलचा यशस्वी विस्तार होत आहे. त्यांनी एक जग तयार केले आणि या जगात शेतकरी हाच राजा आहे. आज गुजराथ मध्ये दुधाच्या उत्पादनांसाठी रोज एक दशलक्ष शेतकरी काम करत आहेत व वर्गीस कुरीयन मुळे आज शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन मिळाले. या महान कतृत्ववान जादुगाराच्या जीवनप्रवासावर बॉलीवुडचे लक्ष गेलेच आणि मंथन नावाचा चित्रपट तयार झाला.  अशा या वर्गीस कुरीयन यांना २००६ साली बोर्डाच्या अंतर्गत राजकारणांमुळे ५७ वर्षाच्या अथक परीश्रमांनंतर राजीनामा द्यावा लागला. आज अखंड आयुष्य त्यानां साथ देणाऱ्या त्यांच्या शांत व सौज्जवळ पत्नी सोबत ते आपला वेळ घालवत आणि आणंद मध्ये नित्यनियमाने ते किमान २ तास फेरफटका मारत. आणंदला सुरु केलेला त्यांचा हा विलक्षण प्रवास आणंद मध्येच संपला .भारताच्या बळीराजाला यशाच्या यशोशिषरांवर पोहचवणाऱ्या वाटाड्य़ाचा अंत झाला. ज्याने देशाला दुध पाजले त्यांनी आयुष्यात कधीच स्वता दुध प्यायले नाही. अमुलच्या प्रत्येक प्रोडक्टवर हसतमुख असणारी नटखट बाहुली सुद्धा या बळीराजाच्या निधनांने आसवं गाळत बसली. अशा या मिल्क मॅन ऑफ इंडीयाला मानाचा मुजरा...
    




Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क