बांग्लादेशी घुसखोरांचा नंगानाच

बांग्लादेशी घुसखोरांचा नंगानाच



भा
रताच्या एका राष्ट्रात म्हणजेच आसाम मधील बोडो जिल्हात मोठ्या प्रमाणात दंगल उसळली. हि दंगल नेहमी प्रमाणे हिंदु मुसलमानांचीच होती पण यात असलेले मुस्लिम हे भारतीय नसुन बांग्लादेशी होते. बांग्लादेशातुन मोठ्या प्रमाणात घुसखोर आसाम तसेच भारताच्या विविध राज्यात  दाखल झाले आहेत. हे एक विदारक सत्यच आहे. बांग्लादेशातून सातत्याने मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरु आहे. २०१० च्या जनगणनेनुसार १५ टक्के असलेल्या घुसखोरांची संख्या ३१ टक्क्यावर गेली आहे. त्यावरुन बांग्लादेशातून सध्या किती घुसघोरी सुरु आहे याची कल्पना येऊ शकते. कोक्राझार, चिरांग, धुबरी जिल्ह्यातील हिंसाचाराने पुन्हा एकदा स्थानिक आणि बांग्लादेशी घुसखोर यांच्यातला जुना वाद उङ्गाळून आला आहे. आसामच्या सीमारेषा धुमसण्याचे खरं कारण भाकरीहेच आहे. बांग्लादेशची अवस्था पाहता मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या आणि बेकारी यामुळेच मोठ्या प्रमाणात बांग्लादेशीयानां भारतात घुसखोरी करावी लागते. कुठल्याही देशाचे नागरीक स्वइच्छेने आपला प्रांत सोडत नाही तर परिस्थितीने त्यानां तसे करावे लागते. पाण्यासारखा सर्वानां सामावणारा भारतच त्यानां पैसे कमाविण्यासाठी व आपले गुजरान करण्यासाठी योग्य वाटतो. बांग्लादेशात रोजगारच नसल्यामुळे भारतात मिळेल तो रोजगार बांग्लादेशी घुसखोर सहजच स्विकारतात. आणि त्यामुळे मुळनिवासीच्या हक्कावर आणि पोटापाण्यावर गदा येते आणि याच एका कारणां मुळे आसाममध्ये ही वादाला ठिणगी पडली. पण बांग्लादेशी घुसखोरानींच आपल्या आसामवासीयांवर हल्ले केले ते एका खोट्या व्हिडीओ मुळे याच दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात एक व्हिडीओ प्रसारित झाला त्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला काहीजणांचा समुह जिवघेणी मारहाण करतोय आणि एक मुस्लिम महीला आपल्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगते आणि बोलते जाग उठो मुसलमानों.. आणि त्यानंतर कुठल्यातरी आप्पत्तीच्या ठिकाणचे व्हिडीओ दाखवण्यात आले. त्यामध्ये सरळ सरळ कळत आहे की, ही संपुर्ण व्हिडीओ ही एडिट करुन बणवण्यात आलेली होती आणि आमचेच मुस्लिमबाधव त्यावर विश्वास ठेऊन मुंबईत निदर्शन करत हिसांचार करु लागली. आसाम मध्ये यामुळे कित्येकांचे बळी गेले आणि लाखोंच्या घरात लोक निर्वासित झाले. गृहमंत्री म्हणाले, या हिसांचारात बाहेरील शक्तीचा हात. तर पंतप्रधानांनी ३०० कोटीचे पॅकेज दिले असा होता आसाम हिंसाचार आणि त्यानंतर झालेला वाद. हे सगंळ कळाल्यावर फक्त एकच वाटतं की, आपण ज्यानां बाग्लादेशी घुसखोर मानतो तेच कधीकाळी आपले सोबती होते. यामध्ये एक पाहता. आपल्या पंतप्रधानांनी ३०० कोटीचं पॅकेज देण्यापेक्षा तेच ३०० कोटी बांग्लादेशीनां शोधण्यात घालवले पाहिजे. त्याच बरोबर बांग्लादेशला आज मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे आंतराष्ट्रीय पातळीपर जर त्यानां मदत मिळाली व तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात कुटुंब नियोजन आणि शिक्षणाचा प्रसार झाला तर कदाचित उद्याची परिस्थिती बदलू शकते. आजची परिस्थिती पाहता आपल्या देशात संजय गांधीनी राबवलेल्या कुटुंब नियोजनाच्या (नसबंदीच्या) मोहीमेचा मुस्लिमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार करायला हवा. कारण अल्लाह की देनं या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या मुसलमानांनी कुटुंब नियोजन केल्यास बेकारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल व लोकसंख्येवर नियत्रंण राखण्यास मोठी मदत होईल. त्याच बरोबर आपल्या देशाची यंत्रणा जर अतिशय लवचिक व प्रभावी असती तर ही घुसखोरी मोठ्याप्रमाणात रोखता आली असती पण दुर्देव अजुन काय की, आपले सत्ताधीशच असे तर काय करता येईल. या सत्ताधीशानां साधे भारताच्या सिमेवर साधे कुपंन बांधता नाही आले. या पलीकडे दुर्दैव ते काय असु शकते. मला तरी असे वाटतं जर मुसलमानांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला असता तर त्यानां त्या व्हिडीओचे सत्य लगेच कळाले असते पण अशिक्षितांमुळे तो खोटा व्हिडीओ पण खरा ठरला आणि त्यामुळे धर्माधांनी व त्याच्या स्वार्थी नेत्यानी इस्लाम खतरे में ची हिरवी बाग दिली आणि आपला मुस्लिम बांधव भावनेच्या आहारी जाऊन सत्य असत्याची पडताळणी न करता हिंसाचारात सामिल झाला. या हिंसाचाराला माझ्या लेखी तरी आपलेच दुर्देव आहे की आपल्यावर सत्ता करणारे सत्ताधीश इतके षंढ आहेत. या हिंसाचारालाच्या लेखाचा समारोप फक्त काही शब्दातच होऊ शकतो. दुर्देव, दुर्देव आणि फक्त दुर्देवच. आणि तेही आपलेच दुर्देव!!!’


 

Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क