अ‘बू’ वाणी.....


बू कर्म
         अबू आझमीनां झालाय नवा साक्षात्कार ते म्हणातायेत की लादेन आणि दाऊद आंतकवादी नाही.. किती हास्यास्पद आणि केविलवाना प्रयत्न आहे ना हा मुस्लिम समाजाला आपल्याकडे वळवण्याचा. खरंच अशा या अबू आझमीला काय करावे काय मान द्यावा हे तुम्हीचे तुम्हीच ठरवा मी तर फक्त झाल्याप्रकरणांवर थोडासा मागील घटनांचा आढावा घेतो... नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीला देशात जातीय विद्वेषाचा आगडोंब माजला होता. या विखाराने अनेक नेत्यांना जन्म दिला. अबू असीम आझमी हे त्यातलंच एक नाव मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोट कटाचा आरोपी म्हणून अटक झाल्यानंतर अबू आझमी हे नाव ठसठशीतपणे जगासमोर आलं. अबू ट्रॅव्हल्सचे मालक असलेल्या आझमींवर बॉम्बस्फोट कटाचे म्होरके असलेल्या मेमन बंधूंना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यथावकाश सुप्रीम कोर्टाने त्यांची सुटका केली. तत्पुर्वी त्यांना टाडाअंतर्गत १४ महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती. ही नामुष्की एखाद्याचं आयुष्य बरबाद करायला पुरेशी ठरली असती पण तीच त्यांच्या राजकीय कारकीर्दींचं प्रमुख भांडवल बनली.
         उत्तरप्रदेशात ते लहानाचे मोठे झाले. जौनपूरच्या एम.डी. हुसेन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर्स ऑफ आर्टची पदवी घेतली. नंतर ते कुलाब्यात स्थायिक झाले. इथलं कोयला हॉटेल त्यांच्या मालकीचं. घरही तिथेच, अगदी प्रासादतुल्य. एक मुलगा आणि पाच मुली असा मोठा कौटुंबिक गोतावळा असलेला हा नेता पठडीतल्या कट्टरतावादी मुस्लिम नेत्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. दाढी न वाढवता, डोक्यावर फर कॅप न घालताही त्यांनी मुस्लिमांमध्ये स्वत:चं नेतृत्व प्रस्थापित केलंय. तोंडी असलेल्या आगखाऊ भाषेमुळे हे शक्य झालंय. भिवंडीत पोलिसचौकीला विरोध करण्याचा प्रश्न असो किंवा आझाद मैदानात काढलेला बुशविरोधी मोर्चा, त्यांची भाषा नेहमीच चिथावणीखोर राहिली. अल्पसंख्यकांना पेटवणे आणि बहुसंख्य समाजाच्या मनात असुरक्षितता निर्माण करणे ही आझमींची खासियत. पोलिसांनाही अनेकदा या आगखाऊ भाषेचे तडाखे सोसावे लागलेत. मुंबईच्या लोकलमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी आपली चौकशी केली जातेय याचा त्यांना वास लागला. संतापलेल्या आझमींनी पोलिस खाते बंद करा आणि हजामतीची दुकाने उघडा या शब्दात मुंबई पोलिसांच्या इंटेलिजन्स विभागाचा जाहीर पंचनामा केला. दगडाखाली हात असतानाही ही मस्ती कमी झाल्याचं दिसत नाही. आझमींचा मुलगा फरहान आणि त्याच्या मित्रांना २००३ साली दुबईत कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हाही आपल्या मुलाचा याप्रकरणात काडीचाही संबध नाही असं सांगून त्यांनी हात झटकले होते. राज्यसभेचे खासदार म्हणून आझमी यांनी उपस्थित केलेल्या विषयांवर नजर टाकली तरी त्यांचं राजकारण कोणत्या दिशेनं जात आहे याची कल्पना येऊ शकेल. बाबरीप्रकरणाची चौकशी करणाऱ्या लिबरहान आयोगाच्या कामाला होणारा विलंब, पोलिसांकडून होणारे तथाकथित फेक एन्काऊंटर, गुजरात दंगली, नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांसाठी आरक्षण, सच्चर कमिटीचा अहवाल, हाज यात्रेकरूंना विमानप्रवासात सूट आणि असं बरंच काही. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक कृती आणि उक्ती मुस्लिम समाजाच्या तापलेल्या भावनांना हवा देणारी. मुंबईत सपाची ताकद किती हा वादाचा मुद्दा असला तरी अबू आझमी हे महाराष्ट्रातले वजनदार नेते आहेत हे मात्र नक्की. हे वजन त्यांच्या उपदव क्षमतेने मिळवून दिलेलं आहे. रॉनी मेन्डोसा मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी असताना 'अबू आझमी हा दाऊदचा खास माणूस आहे' असं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं होतं. पण तरीही ते राजकारण करतात, भाषण ठोकतात. कधी २० लाख मुस्लिमांना रस्त्यावर उतरवण्याची हाळी देतात तर कधी आझमगढमधून गुंडांची कुमक मागवून समाचार घेण्याची धमकी. हे सगळं खपून जातं कारण आझमींचं अस्तित्व ही काही राजकारण्यांची राजकीय गरज आहे. आज हेच मुस्लिम समाजाचे तारणहार म्हणुन मिरवणारे अबू आझमी महाराष्ट्र विधानसभेच्या २ जागी आमदार म्हणुन निवडुनही येतात.आणि आतातायीपणा करत हिदींतुन शपथ घेण्याचा अट्टासही करतात आणि त्याच पवित्र विधानसभेत स्वताःचे थोबाड मराठीचा शिवधनुष्य घेतलेल्या मनसैनिकांकडुन फोडुन घेतात.या अबू आझमींची संपत्तीही डोळे पाढंरे करणारी बरं का... १२५ करोड स्थावर आणि जंगम..म्हणुनच अबू आझमी हे एक नाव आज सर्वानांच परिचित आहे.. मुस्लिमवस्त्यांचा तो भावी बाबाच.. आणि आपल्या अमोघ भाषणांनी मुसलमानांच्या मनात हिदुत्त्वांबद्दल आकस निर्माण करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची हेच त्याचे एकमेव काम आता तुम्हीच ठरवा या बू आझमीनां झालेला साक्षात्कार खरा की खोटा...!!!

Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क