पुरस्कारांची घराणेशाही...
पुरस्कारांची
घराणेशाही..
नुकतेच कळाले
की, पं.हदयनाथ मंगेशकर पुरस्कार हा जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना घोषित
झाला आहे. लहान भावाच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मोठ्या बहिणीला दिला
जाणार आहे. आपलेच लोक आणि आपलाच पुरस्कार हे कसं समीकरणं जुळते. आशा भोसले या एक कलावंत
आहेत त्यात वादच नाही. पण पं.हदयनाथ पुरस्कार हा पंडीत हदयनाथ भोसलेयांच्या हद्येश
आर्टस तर्फे देण्यात येतो. घरातलीच संस्था आणि घरातल्याच व्यक्तीच्या नावे दिला
जाणारा पुरस्कार आणि तोही घरातल्याच व्यक्तीला आणि तोही घरातल्याच व्यक्तीच्या
हस्ते हे किती गौरवास्पद आहे. हे काय कळलं नाही बुवा...!
आता आशा भोसलेनां कुणी ओळखत नाही असे पण काही नाही.जगभरात त्यांचे चाहते आहे.
त्या एक जेष्ठ लोकप्रिय गायिका आहेत तसेच जगभरात त्यांची खंमग पदार्थांची सेवा
देणारे त्याचे अनेक रेस्टॉरेन्टस् आहेत अशा नेहमी चर्चेत राहणाऱ्या आशा भोसले या
जेष्ट गीतकार आर.डी.बर्मन यांच्या पत्नी आहेत. अशा सुप्रसिद्ध आशा भोसले यानां
घरातील पुरस्कार देण्यात काय अर्थ? कलावंताला त्याची कला जोपासण्यासाठी त्या कलेला उत्तेजन
देण्यासाठी आणि कलावंताला प्रोत्साहीत करण्यासाठी व त्याच्या कलेचा सन्मान राखण्यासाठी
पुरस्कार दिले जातात. आता आशाताईनां पुरस्कार भेटलेच नाही अशातलाही काही प्रकार
नाही.
८०चा
उंबरठा ओलांडणाऱ्या आशाताईनां आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार, २००० – २००१ साली चित्रपट
क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ पुरस्कार , २००८ साली ग्रॅमी पुरस्कार, भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा
लता
मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार त्यालाच कमी म्हणुन की, काय तर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या
हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने
जीवनगौरव पुरस्काराने ही त्यानां नावाजले आहे. आणि आता आपल्याच बंधुच्या नावाने दिला जाणारा
पं.हदयनाथ मंगेशकार पुरस्कार. घरचा पुरस्कार देण्यापेक्षा हद्येश आर्टस तर्फे या
थोर कलावंताला भारतरत्न देण्याची मागणी झाली असतीतर ती माझ्या लेखी अधिक योग्य
असती.
लाखो
रसिकांच्या हदयावर राज्य करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील नांमाकित व्यक्तीला या
संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात येतो. मान्य आहे आशा भोसलेनीं लाखो काय तर
करोडोंच्या हदयावर आपल्या संगीताच्या अमोख वाणीने अधिराज्य गाजवले पण तरीही
घरातल्याच व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार घरातल्याच व्यक्तीला देणे कितपत योग्य?
आता इथे तुम्ही म्हणाल… कलावंताचा घराशीं काय संबंध? पुरस्कार व्यक्तीला
नसुन त्याच्या कलेला आहे. तर मग माझे उत्तर असे आहे की, देशात दुसरे गायकच नाहीत
का? आणि आशाताईनां हा पुरस्कार मिळणार आहे त्याची रक्कम रोख
१ लाख रुपये आहे. आता असे ही नाही की, आशाताई दारिद्र रेषेखालच्या गरीब कलावंत
आहेत. की, त्यांच्या उतारवयात त्यानां या रक्कमेचा आधार होईल अशातलाही प्रकार नाही.
मागच्या
वर्षी हाच पुरस्कार भारतरत्न ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर यानां देण्यात आला होता.
आणि यावर्षी आशा भोसलेनां देण्यात येणार आहे. म्हणजे भावाबहिणीतच पुरस्कारचे वितरण
झाले आहे. पं.हदयनाथांचे कर्तृत्त्व, गायनाची त्यांची ख्याती पुढे न्यायची असल्यास
घरातल्या घरात पुरस्कारांचे वाटप करण्यापेक्षा तळागळातील, खेड्यापाड्यातील योग्य
कष्टी कलावंताना अशा पुरस्कारांची आज नितांत गरज आहे. प्रसिद्धीच्या यशोशिखरांवर
असणाऱ्या लोकप्रिय कलाकारनां असे पुरस्कार बहाल करण्याने त्यांच्या मानात कोणता
सन्मानाचा तुरा रोवला जाणार याचे उत्तर माझ्याकडे नाही. संगितावर एका कुटुंबाची
मालकी नाही याचा अर्थ पुरस्कार स्विकारण्याची त्यांची योग्यता नाही असा मुळीच होत
नाही परंतु आजवर मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा मोठे अगदी थेट नोबेलच्या पातळीचे
पुरस्कार स्विकारणे म्हणजे आपल्याबद्दल आदर वाढेल.
पंडीत
हदयनाथ मंगेशकरांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार काल लता मंगेशकरानां दिला आज आशा
भोसलेनां, उद्या उषा मंगेशकरानां, आणि परवा मीना मंगेशकरानां आणि त्यानंतर
मुलाबाळानां इतकीच का त्या पुरस्काराची व्याप्ती? ख्यातनाम
संगितकार पं.हदयनाथ मंगेशकरांचे नाव पुढे न्यावयाचे असल्यास पुरस्कार देण्यासाठी
व्यापक पातळीवर विचार करावा. व त्या पुरस्काराची व्याप्ती वाढवावी. राजकारणातील
घराणेशाही पुरस्कार देण्याच्या पवित्र कार्यात नसावी हे सांगण्या इतपत मी मोठा
नाही. त्यांचे पुरस्कार त्यानांच लखलाभ...!!!



Comments
Post a Comment