भंगारातले स्कायवॉक...



भंगारातले स्कायवॉक...
मुं
बईत एमएमआरडीएने मोठा गाजावाजा करत मुंबई आणि उपनगरात स्काय वॉक बांधण्याची घोषणा केली होती पण या स्कायवॉक मुळे प्रशासनाचे पैसे पाण्यातच गेल्याचे चित्र आज आपण पाहत आहोत. २००७साली मुंबईत ५० स्कायवॉक बांधण्याचा संकल्प एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यानीं केला होता.पुर्व अभ्यास व योग्य नियोजन न पाहता या प्रकल्पाला हात घातला पण अनेक स्कयवॉक तयार झाले. ते म्हणतात ना !! जेवण वाढले  पंचपक्वानपण जेवायला नाही कुणी!”अशी अवस्था या स्कायवॉकची होऊन बसली.
              लोकांची गरज नसतानांही असे स्कायवॉक बांधुन ठेवले. दिवसा कुत्रंही न फिरकणाऱ्या स्कायवॉक मुळे स्थानिक लोक तर प्रचंड भडकलेच. आणि लोकांचा विरोध पाहता व कंत्राटदारांनी चांगलेच कमाविल्यावर मग एमएमआरडीए ला साक्षात्कार झाला. स्कायवॉक असावे की नसावे व त्याचा उपयोग होतो की, नाही हे पडताळण्यासाठी सर्वेक्षण झाले. हे सर्वेक्षण करेपर्यंत ५०च्या ऐवजी ३६ स्कायवॉक बांधुन पुर्ण झाले. आता काय कपाळ..!! आता पुढे त्याच्याच सर्वक्षणातुन हादरवणारे सत्य बाहेर आले. एमएमआरडीएने केलेल्या शेवटच्या सर्वेक्षणात असे स्पष्ट झाले की, ३६ पैकी एक - दोन नाही. तर चक्क १३ स्कायवॉक हे अत्यअल्प वापरात असल्याचे स्पष्ट झाले. आणि या १३ स्कायवॉकसाठी खर्च किती आला तर तब्बल २७७ कोटी रुपये.  आणि याचा वापर करण्याऱ्याचीं संख्य़ा किती तर फक्त ७ ते २० हजार कशी तफावत आहे ना? ही तफावत लक्षात घेता फारसे विचारात न घेता बांघलेले हे स्कायवॉक हे २७७ कोटीचे भंगारच झाले आहेत.
          स्कायवॉक म्हणजे वृद्ध, अंपग, महिला, गरोदर महिला व आजारी व्यक्तीनां डिवचणारे साधनं झाली आहेत. कारण उंच उंच असणारे स्कायवॉकच्या पायऱ्या म्हणजे गडावर चढण्यासारखे. एक एका स्कायवॉकला ५० – ५० पायऱ्या आता सांगा कसे बरे लोक त्याचा वापर करतील? काही स्कायवॉक मुळे तर लोकांनी असा आरोप केला आहे की, आमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर स्कायवॉकमुळे गदा आली कारण इमारतीच्या दुसऱ्या ते तिसऱ्या मजल्यापर्यत उंची असणाऱ्या  स्कायवॉकमुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात सहज डोकावता येते. एमएमआरडीएच्या नियोजन शुन्य कारभारामुळे प्रशासनाच्या तिजोरीला कंत्राटदाराच्या संगतीने या हौशी अधिकाऱ्यानीं चांगलाच चुना लावला. आणि प्रशासनाची तिजोरी कसली हो.. ही तर आपलीच तिजोरी. आपल्याच कडुन अनेक करांच्या स्वरुपातुन स्विकारलेल्या पैसे यांच्या तिजोरीत. आणि याच पैश्याचा वापर करत यांनी मुंबईत बकाल स्कायवॉक बांधुन ठेवले. एमएमआरडीने पैश्याचे भंगार करुन ठेवले. भंगार..!!!

Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क