संवाद माध्यमांची संस्कृती...


संवाद माध्यमांची संस्कृती....

सं
स्कृतीत संवाद आणि संवादात संस्कृती आहे आणि रेडीओ, इंटरनेट, दुरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रे ही संवादमाध्यमेच आहेत. त्यामुळे रेडीओ, इंटरनेट, दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रे यांमध्ये संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात वापर होत जातो. भारतीय संस्कृतीतील संवादमाध्यमे सुद्धा आज आपल्याला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. संस्कृतीत संवाद होतो आणि संवादातुन संस्कृतीचे दर्शन घडते. संवाद माध्यमांमध्ये म्हणजेच रेडीओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे आणि इंटरनेट यातुन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडत असते. वर्तमानपत्रात गुरुपोर्णिमेचे महत्त्व दर्शवणारे लेख किंवा दसऱ्याच्या मुहुर्तावर आपट्याच्या पानांचे महत्त्व वर्तमानपत्रातील लेखातुन प्रसिद्ध केले जाते. तर मालिकामध्ये सुद्धा पात्रांची केशभुषा, वेशभुषा आणि त्यातील दुश्य यातुन वारंवार आपल्याला आपल्या संस्कृतीचे महत्त्व कळत असते त्याच बरोबर रेडीओतील दिवाळीचा कार्यक्रम किंवा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या संकल्पना यातुन आपल्याला आपली संस्कृती बाबत चर्चासत्र आयोजित करणारे कार्यक्रम आखले जातात. त्यानुसार आपण आपल्या संस्कृतीशी नकळत जुळत जातो त्याच बरोबर इंटरनेटच्या माध्यमांतुन आपल्याला आपल्या देशाच्या संस्कृतीबरोबरच अनेक देशांच्या संस्कृतीची माहिती मिळत जाते आणि त्यातुन ही संवाद माध्यमे आपआपल्या संस्कृतीशी संवाद साधत असतात.
            वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, किंवा विशेषलेख यातुन वेळोवेळी आपल्याला काहीतरी माहीती मिळत जाते आणि त्याने आपले ज्ञान वृद्धिगत होते. नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व सांगणारे लेख किंवा नवरात्रीच्या नऊ रंगाची माहीती अशा प्रकारे भारतीय संस्कृतीतील मातृदिन व पितृदिन यांची सुद्धा माहिती वर्तमानपत्रातील लेखातुन प्रसिद्ध केली जाते त्याच प्रमाणे दुरचित्रवाणीतील मालिकां मध्ये सुद्धा आपल्या गणेशोत्सवाची आराधना किंवा दहिहंडी दाखवुन संस्कृतीचे जतन केले जाते तर हे पाहुन आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल आदर व आपुलकी निर्माण होते. रेडीओतील कार्यक्रमांमध्ये दहीहंडीच्या दिवशी गाणे लावले जातात तर रक्षा बंधनच्या दिवशी भावाने आपल्या बहिणीला काय दिले किंवा काय केले याचा संबंधित माहिती मांडली जाते अशा प्रकारे नात्यातील ओलावा संस्कृतीच्या माध्यमांतुन जपला जातो. अनेक वेळा परराज्यात सण कसे साजरे केले जातात त्यासंबंधी माहिती सखोलरित्या आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला त्या त्या राज्याच्या संस्कृती विषयी ज्ञान सुदधा मिळते. आणि त्या संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण होते. यामुळेच दूरचित्रवाणी, रेडीओ, वर्तमानपत्रे आणि इंटरनेटसाठी कार्यक्रम तयार करतानां संवाद संस्कृतीचा विचार केला जातो.

Comments