शिवाजी पार्क बाळासाहेबांचेच...



शिवाजी पार्क बाळासाहेबांचेच...
              
                   बाळासाहेब गेल्या ५ दशकाचे वादळ सतरा तारखेला सतराच्या खतऱ्यात सापडले.. बाळासाहेब ठाकरे या ९ अक्षरांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास काही केल्या पुर्ण होऊ शकत नाही हे एकमेव सत्य ! बाळासाहेबांच्या जाण्याने काय पोकळी निर्माण झाली ते त्यांच्यावर व त्यांच्या विचारांचा आदर करणाऱ्या व्यक्तीला कळु शकेल. असे हे बाळासाहेब कोण होते? काय होते? हे आपल्या सगळ्यानांच माहितीये. बाळासाहेब ठाकरे हे नाव माहित नसणारे व्यक्ती महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच असाव्यात. अशा या बाळासाहेबांच्या प्रत्येक सुखा दुखांचे साक्षीदार असलेले त्यांचे शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेचे, शिवसैनिकांचे आणि खुद्द बाळासाहेबांचे एकाप्रकारचे माहेरच. बाळासाहेब हे शिवसेना, शिवसैनिक आणि शिवाजीपार्क या शब्दांविना अपुरेच. यापैकी कोण्याएका शब्दाचा अभ्यास करायचा झाला तरी या उरलेल्या शब्दांविना तो अभ्यास अपुराच. बाळासाहेब, शिवसेना, शिवसैनिक आणि शिवाजीपार्क या प्रत्येकांचे एकमेकांशी सौख्य, आणि असा संबंध की, जो कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. पण नियतीने यापैकी शिवाजीपार्कवरुन शिवसेनेतील शिवसैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबानां निसर्गानियमाने देहरुपी नेले. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवाजी पार्क पोरके झाले. गेल्या पाचदशकात ज्या बाळासाहेबांनी शिवसैनिकानां आपल्या विचारांचे सोने ज्या शिवाजीपार्कातुन दिले ते अंगार बाळासाहेब शिवाजीपार्कातील त्यांच्या चित्तेवरील अग्नीत समाविष्ट झाले. बाळासाहेबांची आग चित्तेच्या अग्णीला जाऊन मिळाली. देशाच्या इतिहासात असा मोठा नेता जन्मला नाही ज्याने एक पक्ष, एक नेता, एका मैदानावर अनेक शिवसैनिकांना गेले ४६ वर्ष मार्गदर्शन केले. म्हणुनच बाळासाहेबांच्या दसरामेळाव्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही दखल घेतली गेली. अशा या वाघाने सुस्ताडलेला महाराष्ट्र जागा केला. मराठी मनावर गेले ४० – ४५ वर्ष निर्विवादपणे अधिराज्य गाजवले. असे हे शिवसेनाप्रमुख आपल्या लाडक्या शिवसैनिकाच्या साक्षीने आपल्या शिवाजीपार्क नावाच्या दोस्ताच्या कुशीत कायमचे विसावले. शिवसेना आणि शिवसैनिकांपेक्षा आता शिवाजी पार्क हा महत्वाचा मुद्दा आहे. बाळासाहेबानीं एका मोठ्या समुहाला मार्गदर्शन केले. दिशा दिली. शिवसेना नावाच्या पक्षाला जन्म दिला तो या शिवाजी पार्क वरुनच. याच शिवतीर्थावर बाळासाहेब शिवसेनेच्या जन्माआधीही रेंगाळले, विसावले, आपल्या श्वानांसोबत खेळले. त्याच शिवसेनेला जेव्हा राज्याला मुख्यमंत्री देण्याची वेळ आली, तेव्हा सुद्धा बाळासाहेबानां शिवाजीपार्काचीच आठवण झाली. शिवाजीपार्कला खरी ओळख भेटली बाळासाहेबांमुळेच. अशा या शिवाजी पार्कवर महाराष्ट्रातील इतिहासातील चौथ्या व्यक्तीवर म्हणजे अर्थातच बाळासाहेबांवर शिवाजीपार्कसारख्या सार्वजनिक ठिकाणी अंतिमसंस्कार करण्याची वेळ आली. ज्या शिवाजी पार्कने शिवसेनेची सुरवात व बाळासाहेबांची सुरवात तुतारी वाजवुन ऐकली त्याच शिवाजीपार्काने बाळासाहेबांच्या शोकात वाजवलेला बिगुल ही ऐकला.
            बाळासाहेबांनी शिवाजी पार्कला ओळख दिली. शिवाजीपार्कवर सुरु झालेला या महान योद्ध्याचा अंतिम प्रवास शिवाजी पार्कवर थांबला. ज्या बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर इतके मनापासुन प्रेम केले त्या शिवाजी पार्काच्या इतिहासात बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी विरोध होतोय. हे ऐकुन आश्चर्यच वाटले आणि अतिव दुखही झाले. बाळासाहेबानांही आपल्या पाश्चात आपल्या स्मारकाला विरोध होईल हे कळल्यावर किती वाईट वाटले असेल. ज्या शिवसेनाप्रमुखांमुळे शिवाजीपार्कात दरवर्षी गर्दीचा विक्रम मोडीत निघत होता. ज्या बाळासाहेबांमुळे शिवाजीपार्कला सुवर्ण इतिहास लाभला त्या शिवाजी पार्कात बाळासाहेबांचा पुतळा नाही होऊ शकत यापेक्षा दुर्दैवविलास तो कोणता. ज्या बाळासाहेबानीं दादरवर शिवाजीपार्कवर भरभरुन प्रेम केले. अनेक सुखांचे दुखांचे दिवस साजरे केले. त्या बाळासाहेबांच्यासाठी साधे स्मारक उभे राहु शकत नाही. काय तर म्हणे खेळाडुसाठी राखीव पिच आहे म्हणुन.. अरे पण तेवढी जागा सोडुन ओसाड पडलेल्या शिवाजीपार्कात काय दुसरे पीच तयारच नाही होऊ शकत का? शिवाजी पार्कात प्रॅक्टीस करुन हिंदुस्थानव्देष्ट्या पाकिस्थानशी सामने खेळायचे यात कसला आला तो पराक्रम? बाळासाहेबांनी नेहमी क्रिडेला वाव दिला. क्रिकेटवर मनापासुन प्रेम केले. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडुचां कायम सन्मान केला. पाकिस्तानच्या जावेद मियादादला पण मातोश्रीत बोलावुन क्रिकेटवरील प्रेम आणि खेळाडुप्रती आदर दाखवला. इतक्या मोठा माणसांने ज्या खेळाचे कायम कौतुक आणि अभिमान बाळगला त्या खेळाच्या मैदानावर बाळासाहेबांचे स्मारक उभे करण्यास विरोध कशाला झाला पाहिजे?
                 बाळासाहेबांचे नुसतेच स्मारक शिवाजीपार्कात न होता तिकडे बाळासाहेबांनी रचलेल्या इतिहासाची, कार्यकौशल्यांची, कर्तृत्वाची महती सागंणारे कलादालन उभारले जावे. नुसतेच स्मारक काहीही करु शकत नाही त्याऐवजी सुसज्ज असे कलादालन बाळासाहेबानां अग्नी दिलेल्या ठिकाणीच बांधायला हवे आणि त्यासाठी विरोध करणाऱ्यानीं तेथील स्थानिकांनी दादरच काय तर महाराष्ट्र सोडुन एखाद्या स्टेडीयम राहवयास गेल्यास कुठलाच गम नसेल. विरोधाला विरोध करुन प्रसिद्धी मिळवण्याती सवयच यांना जडली आहे. शिवसैनिकानां पहिले चेतवायचे आणि नंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या की, मग शिवसेनेवर टिका करायची असा धंदाच यांनी सुरु केलाय. तेव्हा अशा पुटकळ विरोधाकडे लक्ष न देता बाळासाहेबांचा मेणाचा हुबेहुब पुतळा असणारे दालन आणि भव्य स्मारक उभारावेच. मी कुठल्याही प्रकारे शिवसेनेशी जोडला गेलो नाही किंवा शिवसेनेबद्दल अतिव प्रेम आहे अशातला प्रकारही मुळीच नाही. मी समुहाचा आदर राखतो आणि एवढ्या मोठ्या समुहाचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबांचा नितांत आदर व ते महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान व्यक्त करतो म्हणुन माझा विचार आज तुमच्या समोर मांडतो... 


Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क