इंटरनेटवरील श्रद्धांजली...




इंटरनेटवरील श्रद्धांजली...
             वातानुकुलीत कार्यालयात किंवा घरी बसुन इंटरनेटच्या माध्यमांतुन सोशल नेटवर्कींग साईट्स वर जर बाळासाहेबानां श्रद्धांजली वाहायची असल्यास किंवा त्यांच्या प्रती आदर, प्रेम, सन्मान, आणि त्यांचा अभिमान बाळगावयचा असेल तर प्रत्येकाने आपल्या सोशल नेटवर्कींग साईटस् म्हणजे सर्वात लोकप्रिय अशा फेसबुक, ट्विटर, ऑरकुट, गुगल, याहू, जीमेल, ईस्केप सारख्या अकाउन्ट वरील प्रोफाईल फोटो हा मा. बाळासाहेबांचाच ठेवावा. किमान आतापर्यत नाही तर येणाऱ्या १३ दिवसांपर्यत तरी.
         कारण, आपल्या संस्कृतीनुसार एखादी प्रिय व्यक्ती स्वर्गवासी झाल्यावर त्या व्यक्तीच्या स्वर्गवासाच्या शोकाने आपण येणारे १३ दिवस हे त्या व्यक्तीच्या शोकात अर्पित असतो. हा शोक व बाळासाहेबांप्रती आदर व्यक्त करण्याची वेळ आज आली आहे. त्यानुसार माझे महाराष्ट्रातील प्रत्येक बाळासाहेबांचा आदर करणाऱ्या व्यक्तीला अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपले प्रोफाईल फोटो हे बाळासाहेबांचे ठेवावे. बाळासाहेबानां महाराष्ट्रात कायम एकता आणि एकात्मता हवी होती. आणि ही एकता दाखवण्याची वेळ आज आली आहे. या एकतेच्या मजबुतीवर दिल्लीचे ही तख्त राखतो महराष्ट्र माझा. असे सुद्धा लिहीले गेले आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने त्यांचा आदर राखत येणारे १३ दिवस हे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपला प्रोफाईल फोटो म्हणुन बाळासाहेबांचे छायचित्र अपलोड करावे व जगाला आणि उत्तरेतल्या बाळासाहेबव्देष्ट्या नेत्यानां आपले प्रेम दाखवुन द्यावे आणि बाळासाहेबानां अशा प्रकारे अनोखी श्रद्धांजली वाहावी. जगाला आपल्या नेत्याला आपण वाहीलेली अशी दखल घेण्याजोगी श्रद्धांजली दाखवुन द्यावी.
           आज इंटरनेटमुळे जग हे ग्लोबल खेडे आहे असे म्हटले गेले. इंटरनेट आज आपल्या खिशात आहे. या सोशल नेटवर्किंग साईटसची ताकद आज आपल्याला इजिप्त मध्ये झालेल्या उठावानंतर कळली सुद्धा. बाळासाहेबांसाठी हळवे होऊन किंवा वॉलवर एखादा भावस्पर्शी शोकसंदेश टाकुन आपला बाळासाहेबांप्रती असणारा आदर जगाला दाखवता येणार नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवर बाळासाहेबांप्रतीचा आदर दाखवयचा असल्यास येणारे १३ दिवस बाळासाहेबांचे छायचित्र प्रोफाईल फोटो म्हणुन अपलोड करावे. जेणे करुन बाळासाहेबांना आपण वाहिलेली ही श्रद्धांजली हे एक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवर अभ्यासाचा व दखल घेण्याच्या विषय होतील आणि त्यामध्ये आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या सहभागी असु.
     आपण आपल्या अकाऊंट मध्ये प्रोफाईलवर कायम आपलेच फोटो ठेवतो तेव्हा १३ दिवस बाळासाहेबानां श्रद्धांजली वाहण्यास त्यामध्ये बदल केल्यास काही फरक पडणार नाही.  हीच खरी वेळ आहे माझ्या तमाम मराठी बंधु भगिनीनों... ज्यांनी आपल्या मनात मराठी भावना निर्माण केली. ज्यांनी मराठीला श्वास आणि हिदुंत्वाला आत्मा संबोधले. ज्यांनी जय महाराष्ट्र या शब्दाला जन्म दिला. त्या योद्ध्याला सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमांतुन वाहिलेली हिच खरी श्रद्धांजली ठरेल. तेव्हा वाचा आणि बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहा...!!!

(हा लेख पुर्वग्रह कलुषित मनाने वाचणाऱ्यास मी शिवसैनिक आहे असे वाटेल.
 व बाळासाहेबांचा फोटो प्रोफाईल फोटो म्हणुन ठेवल्यामुळे आपण शिवसैनिक होतो असे नाही)

Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क