“आम”च भुत…!!!
“आम”च भुत…!!!
राजकारणाला अरविंद केजरीवाल नावाच्या भुताने झपाटले. दिल्लीच्या तख्तावर
असणारी कॉग्रेसची सत्ता या भुताने गिळुन टाकली असे ऐकिवात आहे. ऐकीवातच नाही हो
खरंच आहे. बसायला व्हॉल्वोची बस कमी पडणाऱ्या दिल्लीतील कॉग्रेस आमदारांची संख्या
आज एक इनोव्हात पुरुन उरेल इतकीच ठेवली या “आम”च्या भुताने. हे भुत म्हणतयं मी “आम आदमी” आहे. पण कालच आलेल्या बातमीत असं कळतयं की
या भुताला रहायला ९ खोल्यांचा फ्लॅट लागतोय.. अबब खरंच आहे की नाही भुत... असो
सध्या
आपण वाचत आहात ते आम आदमीच्या भुताची कहाणी या भुताची भिती इतकी झाली की, दिल्ली
सकट संपुर्ण भारताच्या राजकारणात ‘आम आदमी’च्या भुताची हवा आली. अगदी महाराष्ट्रात सुद्धा या भुताची भिती
वाऱ्यासारखी पसरली. ‘रामन राघव’ पुन्हा
आला हो. पुर्वी ‘रामन राघव’ हा
फुलपाखरांच्या रुपात येऊन मारुन जायचा. पण अरविंद केजरीवाल हा साध्या वेषात येऊन
मारत नसुन संपवुन जातोय. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा परंतु महाराष्ट्रात ‘आम आदमी’च भुत आलं ऐवढं मात्र नक्की.
त्याला
कारण ही तसंच आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वेसर्वा अनुभवी राजकारणी शरद पवारांनी
खुद्द सांगितले की, आम आदमीची चिंता करु नका. कारण त्यांची हवा फक्त दिल्लीतच आहे.
त्यानंतर महाराष्ट्राचे शिवधनुष्य उचलेल्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
सुद्धा सांगितले की, “आप”ला घाबरण्याची
गरज नाही. जिथे फाटते तिकडेच दिलासा दिला जातो. हे माहित नसणारे वरील दोघे जेष्ठ
नेते हे दुधखुळे राजकारणी नाहीत. त्यामुळे “आम”च भुत यांच्या मानगुटीवर बसलं इतकं मात्र खरं. परंतु आता कोणीच काही करु
शकत नाही. “आम”च भुत उतरवण्यासाठी
मांत्रिकांकडे सुद्धा जावु शकत नाही. कारण नुकत्याच झालेल्या
आधिवेशनात महाराष्ट्रातल्या शुर, पराक्रमी राजकारण्यांनी जादु-टोणा विरोधी कायदा
लागु केला.
अरे रे देवा महाराजा... पला पला भुत इलो भुत “आम”चो भुत....
Comments
Post a Comment