शब्दांवर कोणाचा हुकुम...???
शब्दांवर कोणाचा हुकुम... ??? भा षा प्रत्येकाची वेगळी असते तर शब्दही वेगळे असतात. शब्द हे त्या त्या भाषेवर अंवलबुन असतात. पण एक भाषा बोलणाऱ्या समुहाची जशी भाषा एकच असते तसेच त्यांचे शब्दसुद्धा सारखेच असतात. आणि त्यांची वाक्य सुद्धा काही प्रमाणात मिळतीजुळती असतात. परंतु योग्य शब्दांचा वापर करुन वाक्य तयार केली जातात. आणि प्रत्येक वाक्यांचा निर्माता हा ते वाक्य तयार करणारा व्यक्तीच असतो. आज आपल्याला शब्द तयार करता येत नाही परंतु शब्दांचा आधार घेऊन आपण वाक्य मात्र तयार करु शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती आपआपल्या शैलीनुसार त्या वाक्यांना व त्या वाक्यांतील शब्दांवर कमी जास्त जोर देऊन सादर करत असतो. अशीच वाक्य कायम अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. प्रत्येक वाक्य एखादी व्यक्ती आपल्या कल्पनेतुन सादर करत असते. “ आई मला जेवण दे ” हे वाक्य मी तयार केले आहे. या वाक्यातील शब्दांचा निर्माता जरी मी नसलो तरी त्या वाक्याचा निर्माता मी आहे असे मी येथे म्हणु शकतो परंतु आता याच वाक्याचा यापुर्वीही कोणीतरी निर्माता असु शकतो कारण प्रत्येकांच्या कल्पना जरी वेगळ्या असल्यातरी अनेकवेळा वाक...