Posts

पार्थ नावाचा नवा स्पार्क

Image
#स्नेहिल_बाण #स्नेहिल_म्हणे पार्थ पवार नावाच्या त्रिकोणाची तिसरी बाजू आज हा लेख वाचत असतांना पार्थ पवारवरच का लेख लिहावासा वाटला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याला उत्तर हे आहे की, पार्थ पवार हा राजकारणात आलेला खऱ्या अर्थाने युवा चेहरा. तसा पार्थ काही पहिला नाही यंदा सुजय विखे, रणजित सिंह आणि पार्थ यांच्या सक्रिय राजकारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली. सुजय विखे आणि रणजित सिंह हे याधीच राजकारणात सक्रीय होते म्हणून त्यांच्याबद्दल मला लिहावसं वाटलं नाही त्यातुलनेत पार्थची पाटी तशी कोरीच म्हणून हा लेख लिहीतोय, हा लेख लिहायला मला राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याने किंवा पक्षाने सांगितलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी पाहता पार्थ सारख्या तरुण उमेदवारासाठी लिहावं असं जरुर वाटलं. म्हणून लिहीतोय. एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा राजकारणात आला तर त्यात वेगळं ते काय? ते होणारच होतं.. कधी ना कधी तो राजकारणात येणारच होता.. किंवा कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असे अनेक प्रश्न आणि दावे उपस्थित झाले. खुद्द पार्थच्या आजोबांनी ...

“आम”च भुत…!!!

“ आम ” च भुत… !!!                राजकारणाला अरविंद केजरीवाल नावाच्या भुताने झपाटले. दिल्लीच्या तख्तावर असणारी कॉग्रेसची सत्ता या भुताने गिळुन टाकली असे ऐकिवात आहे. ऐकीवातच नाही हो खरंच आहे. बसायला व्हॉल्वोची बस कमी पडणाऱ्या दिल्लीतील कॉग्रेस आमदारांची संख्या आज एक इनोव्हात पुरुन उरेल इतकीच ठेवली या “ आम ” च्या भुताने.  हे भुत म्हणतयं मी “ आम आदमी ” आहे. पण कालच आलेल्या बातमीत असं कळतयं की या भुताला रहायला ९ खोल्यांचा फ्लॅट लागतोय.. अबब खरंच आहे की नाही भुत... असो                सध्या आपण वाचत आहात ते आम आदमीच्या भुताची कहाणी या भुताची भिती इतकी झाली की, दिल्ली सकट संपुर्ण भारताच्या राजकारणात ‘ आम आदमी ’ च्या भुताची हवा आली. अगदी महाराष्ट्रात सुद्धा या भुताची भिती वाऱ्यासारखी पसरली. ‘ रामन राघव ’ पुन्हा आला हो. पुर्वी ‘ रामन राघव ’ हा फुलपाखरांच्या रुपात येऊन मारुन जायचा. पण अरविंद केजरीवाल हा साध्या वेषात येऊन मारत नसुन संपवुन जातोय. श्रद्ध...

मारुनच टाका पोलिसानां.....!!!

Image
मारुनच टाका पोलिसानां..... !!!                 संतश्री सदगुरु विश्वात्मा महात्मा स्वर्गीय. लख्खनभैय्याजी यांचा एन्काउंटर केल्या मुळे आपल्या पोलिसदलातील पोलिसानां फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय असं वाचण्यात आलं. मी तर म्हणतो देताच कशाला या पोलिसानां शस्त्र. सर्वात सोप्पा पर्याय पोलिस खातेच बरखास्त करा आणि स्व.शाहिद आझमी सारखे किंवा मझिद मेमन सारखे नाही तर स्व.लख्खन भैय्या सारख्या ह्यात असणाऱ्या समाजसुधारकानांच सांगा आता आमचे संरक्षण करायला. उगीच नसता भार सरकारच्या डोक्यावर कशाला ? आता कार्यरत असणाऱ्या पोलिसानां सांगा या सारख्याच्यां हाता खाली काम करा. कारण 12 – 12 तास काम करण्याची पोलिसानांच सवय आहे ना.. म्हणुन... !!                  नुकतीच सरकारी वकीलांनी मागणी केलीय की, लख्खनभैय्या एनकाऊन्टंर प्रकरणी पोलिसानां फासावर लटकवा. मी तर अशी मागणी करतो की, ज्या सरकारी वकिलानीं अशी सुयोग्य मागणी केली त्याच्य...

किती दिवस सहन करायचा बंद??

Image
किती दिवस सहन करायचा बंद??                       आज काल जो तो उठतो संप करतो. साला , आमच्या जिवावर जगतात आणि आम्हालाच वेठीस धरतात ? आमच्या वर राज्य करणारे पुळचट सरकार नुसत्याच पोकळ धमक्या देणारं. किती दिवस चालणारं हे सगळं ? किती सहन करायचं आम्ही ? कोणी दिशा देणारं नाही ? कोणी समजुतदार नाही ? मग काय होणार काय ? जो तो उठतो बंद करतो. त्रास आम्हाला होतो . सरकारशीं नपटलेला सौदा बंदच हत्यार उपसुन पुर्ण केला जातो. लोकशाही मार्गात जरी बंदच्या काहीही व्याख्या असल्या तरी नागरीकानां त्रास देणारे हे बंद कायमचे बंदच व्हायला पाहिजे. आता काय तर म्हणे , एलबीटी जाचक आहे म्हणुन बेमुदत संप.... !!! या बंदात सहभागी होणारे एक एक दुकान फोडलेच पाहीजे. आज तर औषध विक्रेत्यांचांही बंद. उद्याच्या पेपरात १०० खात्रीने मी सांगतो. औषधं वेळेवर न मिळाल्याने मृत पावलेल्या एखाद्या महाराष्ट्रीय नागरीकांची बातमी आपल्या वाचनात येणार.             ...

हा काय, जागतिक महिला दिन..???

Image
हा काय , जागतिक महिला दिन.. ???       आज काय जागतिक महिला दिन. सर्वत्र नारी शक्तीचा जयजयकार. प्रत्येकाच्या फेसबुकच्या वॉलवर महिलानां शुभेच्छांचे आकर्षक ग्राफिक्स.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्यां वॉलवर आपल्या नेत्यांची आणि त्यांच्या पत्नीचे छायचित्र. स्त्रीशक्तीचा जागर आणि महिलांबद्दलचा आदर इत्यादी. गेल्या अनेक वर्षापासुन आपण हेच करतोय. गेल्या अनेक वर्षापासुन माझे फेसबुकचे खाते कार्यान्वित आहे. दर वर्षी महिलांचे प्रेम जागतिक महिला दिनांच्या दिवशी आणि मातृदिनांच्या दिवशीच उफाळुन येते. एखाद्या व्यक्तीचा आवडलेला ग्राफिक्स लगचेच शेअर करायचा किंवा स्वताः अपलोड करुन आपल्या वॉलवर टाकायचा इतकेच.         मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर याच दशकातील एखाद्या महिलांचे छायचित्र टाकायचे आणि आपला महिला दिन साजरा करायचा. मागच्या वर्षी सुद्धा हाच सुळसुळाट होता. हाच भंपकपणा होता. पण गेल्या 365 दिवसात काय झाले. या छायचित्रांत बद्दल झाला ? नाही . तेच छायचित्र त्याच शिळ्या चारोळ्या आणि त्याच काव...

दुखाचा सुर्य मावळला...

Image
दुखाचा सुर्य मावळला... दुखाचा सुर्य मावळला...               आजचा सुर्य मावळला. मावळता सुर्य आपल्या सोबत अनेक दुख घेऊन गेला. २०१२ हे वर्षच तसं दुखात गेलं. महाराष्ट्रावर तर अनेक संकटाचे पहाड कोसळले. अनेक सुखद घटना कमी आणि दुखाचे सावट घेवुन आलेल्या या २०१२ ने आपल्याला फार काही दिले असे नाही. पण अनेक महाराष्ट्राचे रत्न आपल्यातुन या कुटील डावाने हिरावुन घेतले. सिनेसृष्टीतर दुखाचे सावटच होते. वर्षाच्या सुरवातीलाच कल्पना मोहन, रुबीना शेरगील, मोना कपुर, जॉय मुखर्जी, अचला सचदेव सारख्या जेष्ठ तारकांच्या निधनाने २०१२ सुरु झाले. दिग्दर्शक ओ.पी. दत्ता हे सुद्धा वृद्धापकाळाने गेले. मुंबईचे मा. पोलिस आयुक्त हसन गफुर यांचे हद्यविकाराने निधन झाले. हसन गफुरांच्या निधनांने मुंबई पोलिस हादरले शिस्तप्रिय आणि आपल्या पोलिसांवर प्रेम करणारा अधिकारी इतक्या लवकर जाईल असे कदापि कोणालाच वाटले नव्हते. त्यानंतर सगळे हळहळले ते रसना गर्ल तरुणी सचदेवच्या अपघाती निधनाने याच मे महिन्यात बॉलीवुडचा बॉडीबिल्डर ...