किती दिवस सहन करायचा बंद??

किती दिवस सहन करायचा बंद??
                      आज काल जो तो उठतो संप करतो. साला, आमच्या जिवावर जगतात आणि आम्हालाच वेठीस धरतात? आमच्या वर राज्य करणारे पुळचट सरकार नुसत्याच पोकळ धमक्या देणारं. किती दिवस चालणारं हे सगळं? किती सहन करायचं आम्ही? कोणी दिशा देणारं नाही? कोणी समजुतदार नाही? मग काय होणार काय? जो तो उठतो बंद करतो. त्रास आम्हाला होतो. सरकारशीं नपटलेला सौदा बंदच हत्यार उपसुन पुर्ण केला जातो. लोकशाही मार्गात जरी बंदच्या काहीही व्याख्या असल्या तरी नागरीकानां त्रास देणारे हे बंद कायमचे बंदच व्हायला पाहिजे. आता काय तर म्हणे, एलबीटी जाचक आहे म्हणुन बेमुदत संप....!!! या बंदात सहभागी होणारे एक एक दुकान फोडलेच पाहीजे. आज तर औषध विक्रेत्यांचांही बंद. उद्याच्या पेपरात १०० खात्रीने मी सांगतो. औषधं वेळेवर न मिळाल्याने मृत पावलेल्या एखाद्या महाराष्ट्रीय नागरीकांची बातमी आपल्या वाचनात येणार.
                      का करता बंद??? सरकार कडुन मागण्या पुर्ण करण्यासाठीच ना? मग त्याची शिक्षा सामान्य नागरीकानां का म्हणुन..?? अनेक कामे रेंगाळली आहेत. लग्नमुहुर्ताच्या सुट्टीच्या महिन्यात बंद करुन जनतेला का वेठीस धरता? हिच जनता तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो ना? महराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी एलबीटी आणुन राज्यात सुशासन करण्याचे काम केले असतानां आपले व्यवहार जाहीर होतील म्हणुन स्वस्वार्थासाठी बंद..??? माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानां कळकळीचे निवेदन आहे. तुम्ही क्लिन इमेज आहात दिल्लीतुन राज्याचे बिघडलेले स्वास्थ चांगले करण्यासाठी आले आहात. तर आता होऊनच जाऊन दे. बंदच्या नावाखाली तमाशा करुन नागरीकांच्या जिवांशी खेळणाऱ्या या व्यावसायिकानां एकदाची चपराक बसुच द्या.
·       संपकरी प्राध्यापकानां हाकलुन थेट नवी महाभरतीला सुरुवात करा.
·       एलबीटीला विरोध करतानां बंद करणाऱ्या व्यापऱ्यांवर जितके दिवस दुकान बंद तितके दिवस दंड आकारा. व सरकारी पातळीवर विक्रीचालु करा मोबाईल व्हॅनच्या माध्यमातुन.
·       नेहमी भाडेवाढीसाठी रडणाऱ्या आणि बंदचा सहारा घेऊन प्रवाश्यानां छळणाऱ्या रिक्क्षा किंवा टॅक्सी संघटनांनीं बंद पुकारल्यास थेट खासगी ट्रॅवेल्सला बंद संपत नाही तोपर्यत ठराविक कालावधी पर्यतचे परवाने जाहीर करा.
·       डॉक्टरांच्या पदव्या ठराविक कालावधी पर्यत काढुन घेत नवोदित डॉक्टर्सनां संधी द्या.
·       दुधवाढीसाठी सरकारला ठराविक वेळेचे अल्टीमेटम देणाऱ्या दुग्धसंस्थानां धडा शिकवण्यासाठी काही दिवस सरकारी पातळीवर दुधांचे वितरण करा किंवा दुधावर आणिबाणी जाहीर करा,
·       फार्मसीच्या शेवटच्या वर्षातील मुलां कडुन मोबाईल मेडीकल ही संकल्पना सरकारी पातळीवर राबवुन घ्या. (ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस मदत करतात त्याप्रमाणे)
पण हे सर्व करतानां निष्ठावान व कर्तव्यचोख अधिकाऱ्याच्यां अधिपत्याखाली वरील गोष्टीचे नियोजन करा. होऊ देत महाराष्ट्रात तुमच्या नावाचा शिमगा.. दोन चार दिवसात सगळं पुर्ववत होईल व पुन्हा सरकारला किंवा जनतेला वेठीला धरण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
                        महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही आता यांना २४ तासाचा अवधी द्या. यांच्या मतांचा किंवा व्यापाऱ्यांकडुन येणाऱ्या निवडणुकीच्या फंडाची चिंता नकरत तुम्ही हे जाहीर करा महाराष्ट्राची जनता पुर्वी पेक्षा पण अधिक मताधिक्याने तुम्हाला निवडुन देईल. सगळ्यानां वठणीवर आणा आणि मगच महाराष्ट्रात सुशासन होण्यास जास्त वेळ लागणार नाही.

Comments