खरा न्याय द्या...!!!
खरा न्याय द्या...!!!
दुर्देवी भारतीय नारीचा
सिंगापूरच्या अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त असणाऱ्या इस्पिताळात मूत्यु झाला.
नियतीने १६ डिंसेबर रोजी मनाने मारलेल्या माझ्या भारतीय भगिनीला २९ डिसेंबर च्या
मध्यरात्री शरीररुपाने आपल्यातुन नेले. भारतात मनाने मारुन शरीररुपी हाल
सोसण्यासाठी तिला सिंगापुरच्या रुग्णालयात शरीराने जिंवत ठेवण्यासाठी पाठवण्यात
आले. परंतु काळाने आपला डाव साधला आणि एका सुसंस्कृत घराण्यातील विद्यार्थींनींचा
अतिशय वाईट आणि करुण अंत झाला. तिच्या निधनांची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग
सुरु झाला प्रतिक्रियांचा पाऊस.. नेते, गणमान्य व्यक्ती, सेलिब्रेटी, विद्यार्थी
अशा प्रत्येक स्थरांतील लोकानीं आपल्या भावना व्यक्त केल्या. “देश की बेटी” अशी त्या दुर्दैवी नारीला उपाधी मिळाली. ‘देश की बेटी’ जर ती
खरचं असती तर आता तिच्यावर ही वेळ आली असती का? ज्या दिवशी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार झाला त्याच
दिवशी ती गेली. नराधम राक्षसांनी एकापाठोपाठ एक असे जबरी बलात्कार करुन तिला
हालाहाल केले. हेच कमी की काय म्हणुन नतद्रष्ट क्रूर लांडग्यांनी तिच्या शरीराच्या
अतिशय संवेदनशील व नाजुक अशा गुप्तांगात लोखंडी सळी घुसवत अमानुषतेच्या सर्व सिमा
ओलांडल्या. वेदनेने ती निष्पाप किती किंचाळली, किती विव्हळली, तळमळली असेल. आणि हे
सर्व घडले ते आपल्या सार्वभौमत्व असणाऱ्या भारतात पण कायद्याच्या जोरावर या
नराधमानां उद्या फाशीची शिक्षा होईल सुद्धा पण त्यामुळे ती परत येईल? मा.गांधीच्यां माकडाप्रमाणे
मुके,बहिरे आणि आंधळे असणाऱ्या सरकारचे आज सर्व अवयव या महाअमानवी बलात्कारानंतर
जागे झाले. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देणार, महिलासबलीकरणांसाठी कायदे करणार, व
भविष्यात अशा अत्याच्याराच्या घटनांवर कठोर आणि कडक कार्यवाही करणार... सगळं
करणार... पण अजुन पर्यत काय केलं तुम्ही? दिल्लीतील या बलात्कारांनंतर काय बलात्कार झालेच
नाहीत काय? त्यानंतर च्या कालावधीत हे अनेक
कोवळ्या निरागस चिमुरड्यांनां नराधमांनी फुलण्याआधीच कुस्करले. उद्या अनेक कायदे
येतील ही पण त्याला अनेक पळवाटा सुद्धा असतील.
बलात्कारानंतर सोनियाच्या सरकारची
अब्रु तर गेलीच पण पुढील उपचारासाठी तिला परदेशी पाठवुन सरकारने स्वहस्ते आपल्याच
तोडांला काळं फासलं. बलात्कार झाल्यानंतर योग्य उपचार सुद्धा आमचे शासन करु शकत
नाही असे त्यांनी दाखवुन दिले. म्हणजे योग्य उपचार भारतात होत नाहीत हे या अगोदर
सरकारच्या महामहिम हायकंमाडने दाखवुन दिलेच होते. बलात्कारानंतर पिडीत मुलीला
आपल्या देशात वाचवण्यासाठी साधी यंत्रणा नाही हे सिद्ध झालेच. आता तरी पंतप्रधान
राजीनामा देतील का? किंवा एक महिला म्हणुन सोनिया गांधी आपले सरकार
बरखास्त करण्याची हिम्मत दाखवतील का? सत्ताधाऱ्यांचे सोडा पण भारतात आता विरोधी पक्ष जिवंत
आहे की नाही याबाबत कमालीचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारतातील सर्वात मोठ्य़ा
विरोधी पक्षांचे टेंभा मिरवणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरीनीं तर पोलिसानीं
आत्मपरीक्षण करावे असे सांगितले..“अरे रे देवा... असे कैसे दिले तु नेतृत्व आमच्या ठायी...?? असे काय पाप केले की, अशा मुर्दाड
राजसत्तेत आमुचा जन्म झाला” या पेक्षा तालिबानी न्याय परवडला...
इजिप्त सारखी क्रांती भारतात व्हावी व भ्रष्टाचार
करुन गब्बर झालेल्या सत्ताधाऱ्यानां खुर्चीच्या खाली खेचण्यासाठी आज प्रत्येक
भारतीय एकवटला पाहिजे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मेणबत्ती घेऊन एक
झालेला समुह... लोकपालसाठी अण्णांच्या पाठी उभा राहणारा समुह आणि आता या अमानवी
बलात्कारांविरोधी एकत्र आलेल्या समुहात प्रत्येकाने सामिल होऊन सत्ताधाऱ्यांना
खाली खेचत उन्मत माजलेल्याचां माज उतरवण्याची ही वेळ आहे. अमानवी कृत्य करणाऱ्या
बलात्काऱ्यानां त्यांचे कृत्य त्यांच्यावरच उलट करण्यांची शिक्षा का देण्यात येऊ नये? लोखंडी सळीचा वापर त्यांच्यावरच का
करु नये? जे सरकार आपल्या माया – भगिनींना साधी सुरक्षा
देऊ शकत नाही त्या सरकारला तुम्ही माफ करणार ? प्रत्येक कर अगदी नित्यनियमाने वसुल
करणाऱ्या सरकार कडुन साधी सुरक्षा मिळणार नसेल तर मग कशाला हवे यांचे सरकार? परदेशात एक तरुणी मध्यरात्री एकटी
फिरत होती तिला विचारले की तु एकटी का फिरतेस तेव्हा ती म्हणाली मला भिती कशाची
आहे?
माझ्या
बरोबर माझे सरकार आहे आणि त्यांचे कडक नियम. इतका दिर्घ आणि पुर्ण विश्वास आहे
त्यांना त्यांच्या सरकारवर पण लोकशाहीच्या आपल्या भारतात एकतरी मुलगी असे बोलेल का?
आणिबाणीच्या
विरोधात उठावाचे नेतृत्व करणारे जयप्रकाश नारायण जन्माला या.
इजिप्त सारखा लोकांचा उठाव भारतात व्हावा अशी माझी तीव्र इच्छा. भारताला
शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे. क्रांतीचा अर्थ हातात मशाली घेऊन घोषणाबाजी करण्याचा
नसुन येणाऱ्या निवडणुकांमधुन आपला राग व्यक्त करण्याची तीव्र गरज आहे. येणाऱ्या
निवडणुकीच्या तोडांवर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकांचे भुमीपुजन, इंदूमिल
मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकांचे भुमीपुजन, नवी मुंबई विमानतळांचे भुमीपुजन त्याच
बरोबर उड्डाणपुलं, रस्ते आणि गेल्या अनेक वर्षापासुन रखडलेली मोनोरेल आणि मेट्रॉ
रेल्वेचे उदघाटन करुन सरकार विकासाचे गोडवे गाईल व आपल्याला नेहमी प्रमाणे फुस
लावेल तेव्हा प्रत्येक भारतीयांनी निवडणुकीच्या वेळी दिल्लीतील बलात्कार पिडीत
मुलींच्या आर्त किंकाळ्यांच्या आक्रोश आठवावा. आज मेणबत्ती हातात घेऊन घोषणाबाजी
करणारा व फेसबुक वर भावस्पर्शी संदेश टाकणारा प्रत्येक भारतीय जेव्हा जयप्रकाश
नारायण होईल. तेव्हाच या नेत्यांचा माज उतरेल व कडक नियमांची अंमलबजावणी होईल. आज
ही घटना दिल्लीत घडली उद्या आपल्या राज्यात घडेल. आज शेजारांच्या घरात घडली उद्या
आपल्या घरांत घडेल. तेव्हा जागृत रहा. आणि खदखदता ज्वलंत अग्नी मतपेटीतुन व्यक्त
करा आणि त्या पिडीत बलात्कारीमुलींला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्या...!!!!

khupch chaan mitra...i was soo touched
ReplyDelete