वाटेत तुझ्या काचाच गं…!




वाटेत तुझ्या काचाच गं…!


               
                आज दुपारी सुमारे दोनच्या दरम्यान माझ्या मोबाईल मध्ये मेसेजची ट्युन वाजली. पोपटाची शिटी मेसेजट्युन असल्यामुळे समोरच बाललीला करणारी एक दीड – दोन वर्षाची निष्षाप चिमुरडी माझ्या कडे पाहुन अलगद हसली. मी ही निंवात असल्यामुळे व तशी लोकलला गर्दी ही नसल्यामुळे तो मेसेज मला वाचता आला. मेसेज पाठवणारी तरुणी माझ्या चांगल्या ओळखीची. त्यामुळे इतका मोठा मेसेज पाहून थकल्यासारखे वाटले पण सुरवातच बसड्राईव्हरच्या नावाने केल्यामुळे तो मेसेज वाचावासा वाटला आणि त्यानंतर अंगाची लाहीलाही काय होते ते मला कळाले. गेल्या काही दिवसापासुन मुलींच्या बलात्कारांची छेडछाडीच्या बातम्या पाहत होतो. पण काही कारणांने त्या पुर्ण वाचता येणे शक्यच झाले नाही. राज्यातील छेडछाडी, बलात्कार, सुधारगृहातील मुलींचे पलायन, त्यानंतर आमच्या संस्कृतीसंपन्न डोंबिवलीतील बलात्कार प्रकरण, त्यानंतर मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रीया आणि त्यामध्येच दिल्लीतील चालत्या बस मधील बलात्कार अशा अनेक घटनांचा क्रम गेल्या काही दिवसातुन वरवर वाचण्यात आला. पण या मॅसेजने मला त्या घटनेतील नीचपणा क्रुरतेचा कळस, लांच्छानास्पद दुष्कृत्ये आणि अमानुष अमानवी वर्तनाचा चेहराच जणु माझ्या समोर मांडला. मेसेज वाचल्यानंतर मला काय करावे काहीच सुचत नव्हते. सहज नजर त्या निरागस छकुली कडे गेली. आणि मी स्वताच माझ्या मनाला प्रश्न विचारला की आज आई वडीलांबरोबर सुरक्षित असणारी ही निरागस गोड छकुली उद्या खरंच सुरक्षित असेल का?? उद्या ती परत मला पाहुन हसेल का?
                 भारताच्या हद्यात असणाऱ्या दिल्लीत.. चालत्या बसमध्ये एका मुलीच्या अब्रुची लफ्तरं अत्यंत अमानुषपणे उधळली गेली. भारताचे सर्वोच्च न्यायालय, भारताचे संसद भवन, खुद्द पंतप्रधान आणि देशाचा पहिला नागरीक राहत असणाऱ्या राष्ट्रपतीच्या राज्यात आणि ज्या राज्याची मुख्यमंत्री एक महिला आहे त्या राज्यात एक मुलगी चार हरामखोरांच्या हाती लागली. क्रुर आणि नीचपणाचे प्रत्येक नाव त्या चार हरामखोरानां लागु पडेल. इतका क्रुरपणा त्यांनी केला. आजवर भारतात बलात्कार होत नव्हते अशातला प्रकार नाही. पण या बलात्काराने संपुर्ण देश हादरुन गेला. मी तर तो मेसेज वाचुनच हादरुन गेलो. साफ कोसळलो. एक माणुस इतका नीच आणि क्रुर कसा असू शकतो ?
           आता त्या पिडीत मुलीला पाहण्यासाठी सगळे नेते गेले. हेमा रेखा जया आणि सुषमाच्या संसदेत सुद्धा काहीनीं नाटकं केलीत. सोशल नेटवर्कींग साईटवरुन ही भावनाचां उद्रेक झाला. वर्तमानपत्रांनी आणि सबसेतेज असणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी आपल्या परीने वार्ताकने केली. या घटनेवर चर्चासत्रे घेतली गेली. त्यामुळे काही नियम नव्याने बनवण्यात आले. काही कडक निर्बंध लादण्यात आले. जुन्याच नियमांची अंमलबजावणी सुद्धा केली जाऊ लागली. आता संपुर्ण देशात त्या बलात्काऱ्यानां फाशीच्या शिक्षेची मागणी होतेय. काहीनीं सांगितले की, त्यांना नंपुसक बनवा तर काहीनीं सांगितले की, त्यांना चव्हाट्यावर फाशी द्या. उद्या त्या बलात्काऱ्यानां फाशी मिळेल सुद्धा. पण त्या निष्पाप मुलींचे काय ? तिचा दोष काय ? हे नियम बणवण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तिला आज या परीस्थितीचा सामना करावा लागतोय. आज माझ्या सारख्या भावना या प्रत्येक भारतीयांच्या असतील. पण अशा बलात्काराच्या घटनांमुळे आम्हाला उद्या सुनिता विल्यमस्, कल्पना चावला, इंदीरा गांधी, सरोजिनी नायडु, लता मंगेशकर या तयार होतील का? पण मला तुम्हाला खरंच एक प्रश्न विचारायचा आहे की, आज बलात्कारी जरी पकडले गेले असले तरी खरे गुन्हेगार आजही मोकाट आहेत की नाही ? आज जरी या क्रुरकर्म्या बलात्काऱ्यांच्या नावाचा उद्धार चालु असला तरी पुढच्या एका वर्षा नंतर याबाबत कोणीही काहीही बोलणार नाही. हेच काय ते एकमेव सत्य.  ५०%  आरक्षणाचे विधेयक पास करुनही आज माझ्या माता भगिनींच्या वाट्यात काचाच आहेत. अशा या काचांचा प्रवास कधी संपणार परमेश्वरा... कधी संपणार...???

(विनंती - कृपया खालील मेसेज वाचा.)


Comments

  1. i don't know what to comment on this blog as i am still shocked coz of this horrible incident which has shook me as well as the whole nation to the core. Just praying for the Death Penalty for the Rapist 'Haiwaans'. You rightly mentioned that this is not the first Rape case but such a cruel act was never known to anyone of us.

    I wish all Rapists are burned till death, slaughtered to death, and tortured till DEATH. My only wish is to see them DEAD Asap so that no one can even dare to eve-tease or molest or rape any being on this planet.

    ReplyDelete
  2. so proud to know that there are guys who know the importance of a women..
    the rapist should be hanged to DEATH...
    (If men show their power to control women...i gues they should first learn to control them selves)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

पार्थ नावाचा नवा स्पार्क