Posts

किती दिवस सहन करायचा बंद??

Image
किती दिवस सहन करायचा बंद??                       आज काल जो तो उठतो संप करतो. साला , आमच्या जिवावर जगतात आणि आम्हालाच वेठीस धरतात ? आमच्या वर राज्य करणारे पुळचट सरकार नुसत्याच पोकळ धमक्या देणारं. किती दिवस चालणारं हे सगळं ? किती सहन करायचं आम्ही ? कोणी दिशा देणारं नाही ? कोणी समजुतदार नाही ? मग काय होणार काय ? जो तो उठतो बंद करतो. त्रास आम्हाला होतो . सरकारशीं नपटलेला सौदा बंदच हत्यार उपसुन पुर्ण केला जातो. लोकशाही मार्गात जरी बंदच्या काहीही व्याख्या असल्या तरी नागरीकानां त्रास देणारे हे बंद कायमचे बंदच व्हायला पाहिजे. आता काय तर म्हणे , एलबीटी जाचक आहे म्हणुन बेमुदत संप.... !!! या बंदात सहभागी होणारे एक एक दुकान फोडलेच पाहीजे. आज तर औषध विक्रेत्यांचांही बंद. उद्याच्या पेपरात १०० खात्रीने मी सांगतो. औषधं वेळेवर न मिळाल्याने मृत पावलेल्या एखाद्या महाराष्ट्रीय नागरीकांची बातमी आपल्या वाचनात येणार.             ...

हा काय, जागतिक महिला दिन..???

Image
हा काय , जागतिक महिला दिन.. ???       आज काय जागतिक महिला दिन. सर्वत्र नारी शक्तीचा जयजयकार. प्रत्येकाच्या फेसबुकच्या वॉलवर महिलानां शुभेच्छांचे आकर्षक ग्राफिक्स.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्यां वॉलवर आपल्या नेत्यांची आणि त्यांच्या पत्नीचे छायचित्र. स्त्रीशक्तीचा जागर आणि महिलांबद्दलचा आदर इत्यादी. गेल्या अनेक वर्षापासुन आपण हेच करतोय. गेल्या अनेक वर्षापासुन माझे फेसबुकचे खाते कार्यान्वित आहे. दर वर्षी महिलांचे प्रेम जागतिक महिला दिनांच्या दिवशी आणि मातृदिनांच्या दिवशीच उफाळुन येते. एखाद्या व्यक्तीचा आवडलेला ग्राफिक्स लगचेच शेअर करायचा किंवा स्वताः अपलोड करुन आपल्या वॉलवर टाकायचा इतकेच.         मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर याच दशकातील एखाद्या महिलांचे छायचित्र टाकायचे आणि आपला महिला दिन साजरा करायचा. मागच्या वर्षी सुद्धा हाच सुळसुळाट होता. हाच भंपकपणा होता. पण गेल्या 365 दिवसात काय झाले. या छायचित्रांत बद्दल झाला ? नाही . तेच छायचित्र त्याच शिळ्या चारोळ्या आणि त्याच काव...

दुखाचा सुर्य मावळला...

Image
दुखाचा सुर्य मावळला... दुखाचा सुर्य मावळला...               आजचा सुर्य मावळला. मावळता सुर्य आपल्या सोबत अनेक दुख घेऊन गेला. २०१२ हे वर्षच तसं दुखात गेलं. महाराष्ट्रावर तर अनेक संकटाचे पहाड कोसळले. अनेक सुखद घटना कमी आणि दुखाचे सावट घेवुन आलेल्या या २०१२ ने आपल्याला फार काही दिले असे नाही. पण अनेक महाराष्ट्राचे रत्न आपल्यातुन या कुटील डावाने हिरावुन घेतले. सिनेसृष्टीतर दुखाचे सावटच होते. वर्षाच्या सुरवातीलाच कल्पना मोहन, रुबीना शेरगील, मोना कपुर, जॉय मुखर्जी, अचला सचदेव सारख्या जेष्ठ तारकांच्या निधनाने २०१२ सुरु झाले. दिग्दर्शक ओ.पी. दत्ता हे सुद्धा वृद्धापकाळाने गेले. मुंबईचे मा. पोलिस आयुक्त हसन गफुर यांचे हद्यविकाराने निधन झाले. हसन गफुरांच्या निधनांने मुंबई पोलिस हादरले शिस्तप्रिय आणि आपल्या पोलिसांवर प्रेम करणारा अधिकारी इतक्या लवकर जाईल असे कदापि कोणालाच वाटले नव्हते. त्यानंतर सगळे हळहळले ते रसना गर्ल तरुणी सचदेवच्या अपघाती निधनाने याच मे महिन्यात बॉलीवुडचा बॉडीबिल्डर ...

खरा न्याय द्या...!!!

Image
  खरा न्याय द्या... !!!   दुर्देवी भारतीय नारीचा सिंगापूरच्या अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त असणाऱ्या इस्पिताळात मूत्यु झाला. नियतीने १६ डिंसेबर रोजी मनाने मारलेल्या माझ्या भारतीय भगिनीला २९ डिसेंबर च्या मध्यरात्री शरीररुपाने आपल्यातुन नेले. भारतात मनाने मारुन शरीररुपी हाल सोसण्यासाठी तिला सिंगापुरच्या रुग्णालयात शरीराने जिंवत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु काळाने आपला डाव साधला आणि एका सुसंस्कृत घराण्यातील विद्यार्थींनींचा अतिशय वाईट आणि करुण अंत झाला. तिच्या निधनांची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग सुरु झाला प्रतिक्रियांचा पाऊस.. नेते, गणमान्य व्यक्ती, सेलिब्रेटी, विद्यार्थी अशा प्रत्येक स्थरांतील लोकानीं आपल्या भावना व्यक्त केल्या. “ देश की बेटी ” अशी त्या दुर्दैवी नारीला उपाधी मिळाली. ‘ देश की बेटी ’ जर ती खरचं असती तर आता तिच्यावर ही वेळ आली असती का ?   ज्या दिवशी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार झाला त्याच दिवशी ती गेली. नराधम राक्षसांनी एकापाठोपाठ एक असे जबरी बलात्कार करुन तिला हालाहाल केले. हेच कमी की काय म्हणुन नतद्रष्ट क्रूर लांडग्यांनी तिच्या शरीरा...