म्हणे गणपती बाप्पा मोरया....
म्हणे ग ण प ती बा प्पा मो र या .... ग णेशोत्सवाची धामधूम सुरू झाली की अनेक वेळा सर्वसामान्यांच्या काळजात धस्स होते ते वर्गणी नामक जाचामुळे. अनेक मंडळे आणि त्यांच्या वर्गण्या देता देता सर्वसामान्य मेटाकुटीला येतात. एक तर गणेशोत्सवाची वर्गणी देऊन ती सत्कारणी लागण्याचे पुण्य कमवायचीही सोय राहिलेली नाही. गोळा केलेला हा पैसा ही सार्वजनिक मंडळे नेमका कशावर कसा खर्च करतात , याचा हिशेब पाहण्याची कोणतीच सोय आपल्याकडे नाही. गणेशोत्सवात हाती येणार्या पैशाचा समाजोपयोगी कामासाठी विनियोग केला तर ? 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली तेव्हा त्यांचा हेतू होता स्वातंत्र्यासाठी राष्ट्रजागृती करणे. त्यांच्या काळात त्यांनीच सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवांचे उद्दीष्ट पार पडले. स्वातंत्र्य मिळाल्यावरही हे दोन्ही उत्सव अतिशय थाटात साजरे केले जातात. स्वातंत्र्यानंतरच्या सुरूवातीच्या आणि नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सा...