सुशांत आणि आई

सुशांत सिंगराजपूत गेला, स्वतःला संपवलं त्याने.. ज्या गळ्यात सेल्फी साठी सत्करासाठी हार फुल पडत होते त्याच गळ्यात आज सुशांतने फासाचा दोर टाकला, आणि एका क्षणात संपला. जे कारकिर्द उभं करण्यासाठी त्याने शेकडो किलोमीटर दूर येऊन खान-कपूरांच्या भाऊगर्दीत स्वतःची ओळख तयार केली. आज एका क्षणात ती सगळी ओळख संपली आता सुशांत फक्त आठवणीत राहील.. आणि पुढची पिढी कौन सुशांत? असा प्रश्न जरूर विचारेल. 

सुशांतच्या मृत्यू नंतर तो मानसिक तणावाखाली होता असं सांगितलं जातंय. अगदी मी मुद्यावर येतो, म्हणजे त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या आई ला उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यामध्ये त्याने लिहिलं होतं जीवन क्षणभंगुर आहे. या मानसिक तणाव मध्ये त्याला त्याची आई आठवली. आज ती माऊली असती तर त्याने कदाचित असं केलं नसतं.  आई जवळ गेला असता तिच्या कुशीत शिरून काही बोलला असता.. मन मोकळे करून रडला असता.. हसला असता.. खेळला असता बागडला असता, हट्ट पुरवून घेतले असते, रुसला असता, रागावला असता, काही तरी केलं असतं पण स्वतःला संपवलं नसतं. 
आज सुशांत कडे सगळं होतं पण आई नव्हती.. आणि त्याच नसलेल्या आईची त्याला मानसिक तणावात असताना पण आठवण झाली आणि तेव्हा तो म्हणाला जीवन हे क्षणभंगुर आहे आई... जेव्हा सगळं संपतं किंवा काही सुचत नाही तेव्हा आई दिसते.. आई आठवते. हे सत्य आहे.  या आत्महत्या प्रकरणानंतर आज आपल्याकडे सुशांत हा अभिनेता नाही पण आपल्या कडे आई आहे तिची किंमत करा हे सांगणं खुप महत्त्वाचं वाटतेय.
जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा आई असते आणि जेव्हा आपल्या कडे सगळं असतं तेव्हा आई नसते. हे सत्य आहे. 
ज्यांना आई नाही त्यांना आई काय आहे हे कळतं, ज्यांना आई आहे त्यांना आई कळत नाही. आईची किंमत ठरूच शकत नाही. आई विकत घेता येऊ शकत नाही. तिला सांभाळा, हवं नको ते बघा. तिच्या भावनांचा आदर करा.. आईला जपा. 
आज सुशांतची आई असती तर टाहो फोडून रडली असती आज सुशांत गेला काही वेळात अंत्यसंस्कार होतील. पण ते म्हणतात ना,  मेल्यानंतर मृताचे कान उघडणारी बाई असते. तशी आई नसेल. बहुदा ती त्याला स्वर्गात कुशीत घेऊन कुरवाळत असेल. 
माझी एकच इच्छा आहे, मला जेव्हा मृत्यू येईल तो माझ्या आईच्या मांडीवरच यावा.

Comments

  1. Sir .... जेव्हा आपण खूप एकटे पडतो ना या जगात फक्त आईच आठवते दुनिया सब झूठ है ९महिने जास्त ओळखते ती आपल्याला...शेवटच्या ओळीने मन हेलवल

    ReplyDelete
  2. खरोखरचं खूप छान लिहले आहे. आई च महत्त्व त्यांनाच जास्त कळते ज्यांना आई नसते.(माझं वैयक्तिक मत)

    ReplyDelete
  3. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही

    ReplyDelete
  4. खूप सुंदर, खरच डोळे पाणावले

    ReplyDelete
  5. Mom is great withwith mom no life its

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क