हा काय, जागतिक महिला दिन..???



हा काय, जागतिक महिला दिन..???

      आज काय जागतिक महिला दिन. सर्वत्र नारी शक्तीचा जयजयकार. प्रत्येकाच्या फेसबुकच्या वॉलवर महिलानां शुभेच्छांचे आकर्षक ग्राफिक्स.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्यां वॉलवर आपल्या नेत्यांची आणि त्यांच्या पत्नीचे छायचित्र. स्त्रीशक्तीचा जागर आणि महिलांबद्दलचा आदर इत्यादी. गेल्या अनेक वर्षापासुन आपण हेच करतोय. गेल्या अनेक वर्षापासुन माझे फेसबुकचे खाते कार्यान्वित आहे. दर वर्षी महिलांचे प्रेम जागतिक महिला दिनांच्या दिवशी आणि मातृदिनांच्या दिवशीच उफाळुन येते. एखाद्या व्यक्तीचा आवडलेला ग्राफिक्स लगचेच शेअर करायचा किंवा स्वताः अपलोड करुन आपल्या वॉलवर टाकायचा इतकेच.
        मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर याच दशकातील एखाद्या महिलांचे छायचित्र टाकायचे आणि आपला महिला दिन साजरा करायचा. मागच्या वर्षी सुद्धा हाच सुळसुळाट होता. हाच भंपकपणा होता. पण गेल्या 365 दिवसात काय झाले. या छायचित्रांत बद्दल झाला? नाही. तेच छायचित्र त्याच शिळ्या चारोळ्या आणि त्याच काव्यपंक्ती...पण याच 365 दिवसात अमानुष आणि क्रुर अशा माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या अनेक घटनां घडल्या. डॉक्टर सुदाम मुंडे सारखे स्त्रीभ्रुण हत्या करणारे यमदुत पकडल्या गेले. अजुन किती तरी बाहेरचं. दिल्लीतील गॅंगरेप अजुनही ताजाच आणि त्यात भर म्हणुन काल परवा गुडगांव मध्येही असाच अमानुष बलात्कार. बाप पोटच्या मुलींवर बलात्कार करतो, नातेवाईक निरागस मुलींवर बलात्कार करतात, मुकबधीर मुलींवर सुद्धा बलात्कार होतायेत, वसतीगृहात शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब मुलींवर संस्थाचालकच बलात्कार करतायेत.. भंडाऱ्यातर एकाच कुटुंबांतील 3 नाबालिक मुलींवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. बलात्कार असो किंवा छेडछाडीचे प्रकार असो या घटनां थांबतायेत कुठे? यातर वाढतायेत…
       आज महिलांचा सर्वत्र जयजयकार चालु असतानां भारतात आज ही महिला सुरक्षित आहेत का...? नाही. बिलकुल नाही. हेच एकमेव उत्तर आले ना...?? आज रात्री माता भगिनी रात्रपाळी करुन घरी एकट्या येऊ शकतात का? रात्री अपरात्री एकट्या फिरु शकतात का ? आज पोलिसांनी मोठे मोठे फलक लावले की, सोनसाखळी चोरांपासुन सावधान...!!! महिलांनी सोने घालुन फिरु नये.. अशा सुचना त्या फलकात दिल्या होत्या. का घालु नये महिलानीं सोने? त्यांचे अलंकार त्यांनी घालायचे नाहीत ? पोलिसांनी सोनसाखळी चोरानों सावधान असे फलक लावायचे होते पण आपल्या दुदैवाने त्यांनी सोनसाखळीचोरांपासुन सावधान असे फलक लावले.
       आपले कडे कायदे आहेत पण त्याचा धाक कोणालाच नाही. भारतात पोलिस कोठडीतच महिलांवर अत्याचार होतायेत. महिला सुधारगृहात आणलेल्या महिलाच सुधारगृहातुन पळुन जातात. महिला सुधारगृहातील मुलीं गरोदर राहतात. शासनाचे असणारे सुधारगृह जर सुरक्षित नसेल. तर भारतात राहणाऱ्या महिला कशा बरं सुरक्षित असतील? बाजुने जाणाऱ्या एखादया स्त्रीला आयटम म्हणुन बघण्यापेक्षा त्याचा आदर केलात तर फेसबुकच्या वॉल सजवण्यासाठीची धडपड करावी लागणार नाही. आज भारतात महिला सबलीकरणाचा कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. त्या सुधारणांपेक्षा त्या कायद्याची अंमलबजावणी झालीच तर महिलादिनांच्या शुभेच्छा देण्यास खऱ्या अर्थाने आनंद वाटेल. परंतु आज आपल्या दुदैवाने भारताचे नेतृत्व जरी एका महिला हायकंमाडच्या हाती असले तरी, माझ्या माता भगिनी आज सुरक्षित नाहीत. हेच काय ते एकमेव सत्य..


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क